Contact Banner

इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने सावदा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल!

 

Insṭāgrāmavara-ākṣēpār'ha-pōsṭ-ṭākalyānē-sāvadā-pōlice-ṭhāṇyāta-ēkāvara-gunhā-dākhala!

इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने सावदा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल!

लेवाजगत न्यूज सावदा :-  सावदा तालुका रावेर येथे २५ रोज रविवार सायंकाळी ७-१२ वाजेच्या सुमारास शहरातील दिपकराज पाटील समर्थ अकॅडमीचे शिक्षक यांनी बौद्ध समाजाचे आराध्य दैवत असलेले एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून इंस्टाग्राम या सोशल ॲपवर आक्षेपार्ह लिखाण  प्रसारित केल्याने  याबाबत फिर्यादी व त्याचे दोन साथीदारांनी आक्षेपार्य पोस्ट का शेअर केली,अशी विचारणा केली असता माझे काय वाकडे करायचे ते करून घ्या असे धमकी देऊन जातिवाचक बोलून फिर्यादी व त्याचे धर्मांचे भावना दुखावले यावरून, श्रीकांत उर्फ नाना पुंडलिक संन्यास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दीपकराज पाटील यांच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुरनं.१४३/२०२३ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारणा कायदा १०१५ चे कलम ३(१)(आर)(५), व भादवीचे कलम ५०६ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला त्याला अटक देखील करण्यात आले आहे. पुढील तपास एपीआय जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहे,सदर घटनेच्या अनुषंगाने मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे,फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे,सह फैजपूर पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश वाघ पोलीस कर्मचारी,गृहरक्षक दलाचे जवान,दंगा नियंत्रण पथक  उपस्थित होते.

Insṭāgrāmavara-ākṣēpār'ha-pōsṭ-ṭākalyānē-sāvadā-pōlice-ṭhāṇyāta-ēkāvara-gunhā-dākhala!


     "सदरील आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी याबाबत शहरातील आंबेडकरी महिला व पुरुषांनी सामूहिकरीत्या सावदा पोलिस ठाण्यात आंदोलनचा पवित्र घेतला होता"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.