Contact Banner

करंजी, म्हसवेच्या ग्रामसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न



करंजी, म्हसवेच्या ग्रामसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न

शहर प्रतिनिधी वृत्तसंस्था-पारोळा-गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसचा धसका घेऊन पंचायत समितीच्या ग्रामसेविका वैशाली पाटील यांनी २४ रोजी धुळे येथे आपल्या राहत्या घरी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची परिस्थिती गंभीर असून, त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.पारोळा तालुक्यातील करंजी व म्हसवे येथे वैशाली पाटील ग्रामसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामाबाबत तक्रारी असल्याचा तसेच कार्यक्षेत्रात वारंवार गैरहजर राहत असल्याचा ठपका ठेवत तसेच ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी यांच्या खुर्चीवर विनापरवानगी बसणे, इतरत्र फिरणे, कार्यालयीन अधीक्षकांशी वाद घालणे, असे आरोप ठेवून शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत त्यांना २२ रोजी नोटीस दिली होती.

Karanji,-Mhasve's- Village Servant's-Suicide-Attempt


       याचा राग आल्याने वैशाली पाटील यांनी २३ रोजी गटविकास अधिकारी व ओएस यांच्याशी वाद घातला होता. दरम्यान, २४ रोजी सायंकाळी वैशाली पाटील यांनी नोटीसचा धसका घेऊन राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांच्या पतीने विस्तार अधिकारी राजेश इंगळे यांना फोनवरून दिल्याचे समजले. वैशाली पाटील यांनी आपल्या आत्महत्येस गटविकास अधिकारी विजय लोंढे व ओएस जितेंद्र पवार दोषी असल्याचे म्हटले असल्याने याबाबत खळबळ उडाली आहे. 

मी माझे कर्तव्य बजावले... 

कार्यालयीन प्रमुख म्हणून कामकाजात तक्रारी असल्यास नोटीस द्याव्या लागतात. मी माझे कर्तव्य केले आहे. याबाबत पारोळा पोलिस ठाणे, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खुलासाही दिलेला आहे. - विजय लोंढे, गटविकास अधिकारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.