आकाशवाणी ते खोटे नगर महामार्गावरील उड्डाणपुलास श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या
आकाशवाणी ते खोटे नगर महामार्गावरील उड्डाणपुलास श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या
आकाशवाणी ते खोटे नगर महामार्गावरील उड्डाणपुलास श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे मराठा समाजाच्या मराठा महासंघ,छावा संघटना व युवक महासंघाची निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी
लेवाजगत न्युज जळगाव:-
आज अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल भारतीय छावा संघटना, अखिल भारतीय युवक महासंघ तसेच मराठा समाजाच्या वतीने आज या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील यांची भेट घेतली.
आज शहरात एका बैठकीसाठी खासदार आले असता, त्यांना रस्त्यावरती थांबून या संपूर्ण शिष्टमंडळाने निवेदन दिले व आपण देखील मराठा समाजाचे समाज बांधव आहेत,त्यानंतर आपण या लोकसभा क्षेत्राचे खासदार आहात व सदर विषय हा आपल्या कार्यक्षेत्रातील असून या कार्यक्षेत्राचे लोकप्रतिनिधी तसेच समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपण या संपूर्ण प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपण जिल्हाधिकारी महोदय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, त्याच पद्धतीने शहराच्या महानगरपालिकाचे आयुक्त या सर्वांशी समन्वय साधून लवकरात लवकर आकाशवाणी चौक ते खोटे नगर या संपूर्ण उड्डाणपूलाला छत्रपती संभाजी राजे यांचं नाव देण्यात यावे याबाबतची चर्चा केली.
मागील दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा समाजाच्या या शिष्टमंडळाने निवेदनाच्या मार्फत याबाबतची मागणी केलेली होती. परंतु प्रशासनाच्या मार्फत अद्याप कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आज या शिष्टमंडळाने खासदार महोदय यांना सदर मागणीची पूर्तता लवकरात लवकर करण्यासंबंधीची मागणी केली..
याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संघटक प्रमुख देवेंद्र मराठे, अखिल भारतीय छावा संघटनेचे आयटी विभागाचे जिल्हाध्यक्ष केतन पाटील, अखिल भारतीय युवक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील, समाजसेवक पियुष पाटील, कृष्णा पाटील, किरण पाटील, भगवान शिंदे, योगेश पाटील, प्रसाद घोरपडे अक्षय पाटील, समाधान पाटील प्रतीक लोखंडे, आधी समाज बांधव उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत