Header Ads

Header ADS

जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार हभप डॉ रविंद्र भोळे ह्यांना ग्रीन योद्धा सन्मान 2023 प्रदान

 

Senior-Social Worker-Lecturer- Habhap-Dr-Ravindra-Bhole-was-granted-Green-Yoddha-Sanman-2023-

जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार हभप डॉ रविंद्र भोळे ह्यांना ग्रीन योद्धा सन्मान 2023 प्रदान

लेवाजगत न्यूज पुणे: आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस, पर्यावरण संरक्षण तसेच संवर्धन, पर्यावरण जागरूकता तसेच वृक्षारोपण क्षेत्रातील अद्वितीय कार्याबद्दल उरुळी कांचन येथील जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉक्टर रवींद्र जी भोळे यांना नुकताच ग्रीन योद्धा सन्मान 2023 प्रदान करण्यात आला. राजस्थान येथील भावना कला साहित्य फाउंडेशन च्या वतीने नुकताच हा सन्मान प्राप्त झाला आहे .तसेच वरील पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ रवींद्र भोळे यांना' गोल्डन इरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' लेटर ऑफ ऍप्रिसिएशन हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Senior-Social Worker-Lecturer- Habhap-Dr-Ravindra-Bhole-was-granted-Green-Yoddha-Sanman-2023-


       आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसानिमित्ताने गोल्डन इरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स च्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील  समर्पित भावनेने पर्यावरण क्षेत्रात कार्य केल्याबद्दल वरील सन्मान डॉ रविंद्र भोळे ह्यांनाप्राप्त झाला. याप्रसंगी प्रतिनिधी जवळ आपले मत व्यक्त करताना डॉक्टर रवींद्रजी भोळे म्हणाले की नैसर्गिक संसाधनाचा मर्यादित वापर करून, पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकते तसेच वृक्षतोड न करता वृक्ष लागवड करणे अत्यंत महत्त्वाचे असून जैवविविधता जतन करणे काळाची गरज आहे.' झाडे लावा झाडे जगवा' तसेच 'जगा व जगू द्या 'या मंत्राची प्रत्यक्ष कृतीद्वारे अंमलबजावणी होणे काळाची गरज आहे. डीफॉरेस्टस्टेशन यामुळे अतोनात वृक्षतोड होत आहे ,यासाठी निसर्गाचा समतोल राखणे खूपच गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस, पर्यावरण संरक्षण, व संवर्धन व जागरूकता हा उपक्रम वर्षभर राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही मत ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.