Contact Banner

प्रेमी युगलाची एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या

 

Lovers-couple-suicide-by-hanging-with-a-single-rope

प्रेमी युगलाची एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या

 प्रतिनिधी पाचोरा-  शहरातील मोंढाळे रोड वरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुलाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Lovers-couple-suicide-by-hanging-with-a-single-rope


    पाचोरा शहरातील मोंढाळा रोड वरील रहिवाशी जितेंद्र राजु राठोड (वय -१९) व साक्षी सोमनाथ भोई - (वय१८) या प्रेमीयुगुलाने मोंढाळे रस्त्यावरील एका पडक्या शाळेच्या खोलीत एकाच दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत जय मल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रेमी युगलाच्या करूण अंतामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.