पती व त्याच्या पाच मित्रांनी केला महिलेवर बलात्कार
पती व त्याच्या पाच मित्रांनी केला महिलेवर बलात्कार
वृत्तसंस्था -पती बरोबर पटत नसल्यामुळे माहेरी गेलेल्या पत्नीला बाहेर बोलावून घेत पती व त्याच्या पाच मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात तब्बल सहा जणांवर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील पतीसह शैलैंद्रकुमार, अतिशयकुमार, पवन राजेंद्र परदेशी, जितेंद्रकुमार, विजय बन्सी पवार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडितेच्या वतीने तिच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार आता मार्केटयार्ड ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेचा विवाह औरंगाबाद गारखेडा येथील एका तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर तो तिला वारंवार त्रास देत मारहाण करत होता. त्यामुळे तिचे वडील तिला माहेरी पुण्यात घेऊन आले होते.
२७ फेब्रुवारी २०२० रोजी तिचा पती ती राहत असलेल्या घरी आला . तिला घरातून बाहेर बोलावत मार्केटयार्ड संदेशनगर येथील झुडपात नेऊन तेथे पती व त्याच्या मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. आरोपींनी अत्याचाराचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले. याच चित्रीकरणाच्या आधारे आरोपींनी २०२० व २०२१ मध्ये वारंवार तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांत तक्रार केल्यास फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान पतीच्या या अत्याचाराला कंटाळल्याने महिलेने वडिलांमार्फत कोर्टात धाव घेतली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत