महावितरण रोजंदारी कर्मचाच्याचा रिधुरी गावात शॉक लागून मृत्यू
महावितरण रोजंदारी कर्मचाच्याचा रिधुरी गावात शॉक लागून मृत्यू
लेवाजगत न्यूज यावल- तालुक्यातील रिधुरी शेत शिवारात वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली होती. त्यात वीज खांबावर पडलेली फांदी काढताना शॉक लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रिधुरी येथील रहिवासी लोकेश नारायण सोनवणे (वय १८) हा युवक वीज वितरण कंपनीत रोजंदारीवर कामे करतो. बुधवारी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यात गावालगत असलेल्या प्रकाश सोनवणे यांच्या शेतात झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडल्या होत्या. या फांद्या हटवण्याचे काम लोकेश सोनवणे याला सांगितले होते.
दरम्यान खांबावर पडलेली फांदी हटवताना विजेचा शॉक लागून तो जमीनीवर कोसळला. त्यात तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. मोहिनी भुगवाड्या यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी ईश्वर सोनवणे यांच्या खबरीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अनिल पाटील, भूषण ठाकरे करत आहे. दरम्यान, या घटनेमुळे रिधुरी गावासह परिसरात देखील हळहळ व्यक्त करण्यात आली. पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांनी खबरदारी घ्यावी. धोकादायक वीज खांब, रोहित्रांपासून दूर राहावे असे आवाहन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत