Header Ads

Header ADS

तहसिल कार्यालयातून जप्त केलेला रेतीचा टिप्परची चोरी ! नायब तहसिलदारांची पोलिस स्टेशन मध्ये तक्रार ! रेती तस्करविरुद्ध गुन्हे दाखल

Theft of sand tipper seized from tehsil-office!- Naib-tehsildars-complaint-in-police-station!-Crime-filed-against-sand-trafficker


 तहसिल कार्यालयातून जप्त केलेला रेतीचा टिप्परची  चोरी ! नायब तहसिलदारांची पोलिस स्टेशन मध्ये  तक्रार ! रेती तस्करविरुद्ध गुन्हे दाखल 

लेवाजगत न्युज वरुड :- महसूल पथकाने  मंगळवारच्या रात्री १० वाजताच्या सुमारास अवैध गौण खनिज रेतीची वाहतूक करताना टिप्पर पकडून कारवाही केली.

 तहसिल कार्यालयाच्या आवारात जप्त केलेला टिप्पर रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान टिप्परचालकसह चार लोकांनी लोखंडी सब्बल आणि रॉड घेऊन कार्यालयाचे आवाराच्या गेटचे कुलूप तोडून टिप्पर  घेऊन पळाले.घटनेची तक्रार नायब तहसिलदार यांनी दिल्यावरुन पोलिसांनी रेती तस्करविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.

MAHAVITARAN-ROJANDA- DEATH OF EMPLOYEE IN RIDHURI VILLAGE SHOCK LAGOON


    प्राप्त माहिती नुसार आरोपी (एमएच २७ बीएक्स ६५४२ )चा चालक,तसेच प्रफुल बाराई रा,अमरावती अधिक दोन आरोपींचा समावेश आहे. अवैध गौण खनिज तपासणी करण्याकरिता नायब तहसीलदार पंकज चव्हाण,तलाठी प्रमोद सोळंकी,शिपाई मनोज वरठी यांचे पथक महसूल पथक काल मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पुसला रोड ने गस्तीवर गेले होते.  दरम्यान( एमएच २७ बीएक्स ६५४२) क्रमाकांचा टिप्पर रेती वाहतूक करताना आढळून आला.

 सदर टिप्पर थांबवून वाहनाचा पंचनामा करून जप्त केला,जप्त केलेला टिप्पर रेतीसह तहसील कार्यालयाचे आवारात जमा करण्यात आला.  तेंव्हा टिप्पर चालकाला नाव विचारले असता तो पळून गेला. फिर्यादी आणि सहकारी पथक मुख्य गेट ला कुलूप लावून निघून गेले. तर येथे असलेले चौकीदार हनुमंत वाडेकर कार्यालयात झोपले असताना रात्री साडेअकरा वाजतासह दरम्यान चार लोक कार्यालयालयाचे आवारात गेटचे कुलूप तोडून आले. त्यांच्या हातात सब्बल आणि लोखंडी रॉड होते. यामुळे भीतीमुळे चौकीदार बाहेर निघाले नसल्याचे नायब तहसीलदार यांना मोबाईल वरून माहिती देताना सांगितले तर काही वेळाने टिप्पर घेऊन पळून गेले.

  महसूल पथकाचे नायब तहसीलदार रात्री तहसिल कार्यलयात आले असता टिप्पर चोरीला झाल्याचे निदर्शास आल्याने बुधवारी सकाळी साडे अकरावाजाताचे दरम्यान नायब तहसिलदार पंकज चव्हाण यांनी टिप्पर आणि रेतीसह ५ लक्ष २५ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केल्यावर वरुड पोलिसांनि आरोपीविरुद्ध भादवीचे ३८०,३४ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांचे मार्गदर्शनात उपनिरीक्षक धीरज राजूरकर  करीत आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.