रक्षा खडसे यंदा महाविकास आघाडी कडून लढण्याची शक्यता -गिरीश महाजन म्हणाले ऐन वेळी काहीही होऊ शकते
रक्षा खडसे यंदा महाविकास आघाडी कडून लढण्याची शक्यता -गिरीश महाजन म्हणाले ऐन वेळी काहीही होऊ शकते
लेवाजगत न्यूज जळगाव: -रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे आगामी लोकसभेला भाजपऐवजी महाविआतर्फे लढण्याची शक्यता आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे या विषयी चर्चा सुरू झाली आहे.
जळगावातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, की भाजपमध्ये संसदीय मंडळ आहे. तेथूनच सर्व नावे ठरतात. त्यामुळे ऐनवेळी काय होईल हे सांगता येत नाही. मागच्या वेळेस हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी ऐनवेळी बदलण्यात आली. त्यामुळे आज उमेदवारीविषयी सांगणे कठीण होईल. रावेर लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासून भाजपचाच मतदारसंघ राहिलेला आहे. रक्षा खडसेंचा दावा योग्यच आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केंद्राच्या अनेक योजना राबवल्या. चांगले काम केले.
मात्र, उमेदवारीबाबत भाजपचे हायकमांड निर्णय घेत असते. गेल्या काही वर्षांमधील अनुभव बघितले तर हरिभाऊ जावळे, आमदार स्मिता वाघ तसेच खासदार उमेश पाटील यांची तिकिटे ऐनवेळी बदलण्यात, कापण्यात आली, हे लक्षात घ्यावे लागेल असेही ते म्हणाले. रक्षा खडसे यांनी २०१९ मध्ये ३ लाख ३५ हजार ८८२ मतांनी काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना पराभूत केले होते. रक्षा खडसेंना ६ लाख ५५ हजार ३८६ तर डॉ.उल्हास पाटील यांना ३ लाख १९ हजार ५०४ मते मिळाली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत