नंदुरबारच्या भार्गव राजभोग ने राजस्थान येथील कोटा येथे घेतला गळफास कारण गुलदस्त्यात,मुलांना कोटा येथे पाठवण्यावर प्रश्नचिन्ह
नंदुरबारच्या भार्गव राजभोग ने राजस्थान येथील कोटा येथे घेतला गळफास कारण गुलदस्त्यात,मुलांना कोटा येथे पाठवण्यावर प्रश्नचिन्ह
लेवाजगत न्यूज नंदुरबार -शहरातील भार्गव राजभोज या १७ वर्षीय मुलाने कोटा ( राजस्थान) येथे हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. मंगळवारी भार्गववर येथे अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान, कोट्यामध्ये वर्षभरात ११ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
भार्गव हा श्रॉफ हायस्कूलचे शिक्षक केशव राजभोज यांचा मुलगा असून तो इयत्ता ११वीचा विद्यार्थी होता. जेईईच्या तयारीसाठी तो दोन महिन्यांपूर्वी कोटा येथे दाखल झाला होता. त्याचे पालक केशव राजभोज पत्नीसह त्याला भेटायला गेले. सकाळी ११ ला त्याच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर आई-वडील नाश्ता करुन परत आले तेव्हा खोलीचा दरवाजा आतून लावला होता. दरवाजा तोडला असता भार्गवने गळफास घेतल्याचे पाहताच राजभोज दाम्पत्य हादरले. त्यास पुढे एमबीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मुलांना कोटा येथे पाठवण्यावर प्रश्नचिन्ह
भार्गवने अचानक उचललेल्या या पावलामुळे कोटा येथे मुलांना पाठवायचे का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण कोट्यात वारंवार मुलांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहे.
होता. त्याचे पालक केशव राजभोज पत्नीसह त्याला भेटायला गेले. सकाळी ११ ला त्याच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर आई-वडील नाश्ता करुन परत आले तेव्हा खोलीचा दरवाजा आतून लावला होता. दरवाजा तोडला असता भार्गवने गळफास घेतल्याचे पाहताच राजभोज दाम्पत्य हादरले. त्यास पुढे एमबीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत