सावदा येथे पोलीस ठाण्यात दंगा नियत्रंण (मॉब ड्रील) योजनेचा सराव
सावदा येथे पोलीस ठाण्यात दंगा नियत्रंण (मॉब ड्रील) योजनेचा सराव
लेवाजगत न्यूज सावदा- येथे सोमवार दिनांक २६/०६/२०२३ रोजी पोलीस अधिक्षक जळगाव एम. राजकुमार ,अपर पोलीस अधिक्षक जळगाव चंद्रकांत गवळी यांचे आदेशाने उपविभागिय पोलीस अधिकारी फैजपुर भाग फैजपुर कुणाल सोनवणे यांचे उपस्थीतीत मॉब ड्रिल करण्यात आले.
शहर व परिसरात आगामी येणाऱ्या बकरी ईद व आषाढी एकादशी या हिंदू मुस्लिम सणाचे अनुषंगाने सावदा, फैजपुर, व निंभोरा पोलीस स्टेशनतर्फे संयुक्तीकरित्या सावदा येथे दंगा नियत्रंण (मॉब ड्रील) योजनेचा सराव घेण्यात आला. सदर दंगाकाबु सराव कामी सावदा पोलीस स्टेशन चे सपोनि जालींदर पळे, निंभोरा पोलीस स्टेशनचे सपोनि धुमाळ, फैजपुर पोलीस स्टेशनचे सपोनि निलेश वाघ, पोउपनि शांताराम पाटील, पोउपनि अनवर तडवी, पोउपनि रा. का. पाटील, तसेच तीनही पोलीस स्टेशन चे पोलीस अंमलदार व पोलीस मुख्यालयाकडिल दंगा नियंत्रक पथक सदर सरावाकामी हजर होते.
-Practice-of-plan-at-police-station-at-Sawada.jpg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत