Contact Banner

सावदा येथील मुस्लिम समाज बांधव जातीय सलोख्यासाठी एक पाऊल पुढे, बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय

Sawada-Muslim-community-here-one-step-forward-for-communal-reconciliation,-decision-not-to-sacrifice-goat-idla-


 सावदा येथील मुस्लिम समाज बांधव जातीय सलोख्यासाठी एक पाऊल पुढे,

 बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय

लेवा जगत न्यूज सावदा- गुरुवार दिनांक २९ रोजी हिंदू व मुस्लिम बांधवांचे पवित्र सण एकाच दिवशी येत असल्याने हिंदू बांधवांची आषाढी एकादशी हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी  भगवंताचा मोठा उत्साह पूर्ण वातावरणात मानला जाणारा सण व त्याच दिवशी मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा मानला जाणारा मोठा सण येत असून हिंदू मुस्लिम धर्मात  जातीय सलोखा सावदा शहरात कायम टिकून राहावा यासाठी आषाढी एकादशी निमित्त बकरी ईद हा सण येत असला तरी या दिवशी मुस्लिम समाज कोणतीही कुर्बानी न देता हिंदू बांधवांसाठी हा आपला सण कुर्बानी न देता सण उत्साहात साजरा  करण्याचा निर्णय घेतला आहे. असे पत्रक त्यांनी आज प्रसिद्ध  केले आहे.

Sawada-Muslim-community-here-one-step-forward-for-communal-reconciliation,-decision-not-to-sacrifice-goat-idla-


        सविस्तर वृत्त असे की शहरातील विविध भागांतील मुस्लीम समाज बांधवांमध्ये चर्चा करून २९/०६/२०२३ रोजी मुस्लीम समाजाचा बकरी ईद सण साजरा करण्यात येणार असून त्याच दिवशी हिंदु समाजाचा आषाढी एकादशी हा सण येत आहे व हे दोन्ही सण दोन्ही धर्मीयांसाठी पवीत्र असल्याने सावदा शहरात हिंदू मुस्लीम सामाजिक एकोपा व  एकता टिकुन राहावी शहरात बंधुभाव टिकून राहावे सामाजीक ऐक्य आबाधीत ठेवण्यासाठी मदत या  उद्देशाने  सावदा शहरातील मुस्लीम समाजातील लोकांनी हिंदु धर्मीयांच्या आषाढी  एकादशी या सणाच्या धार्मीक भावनेचा आदर करून बकरी ईद निमीत्त दिनांक २९/०६/२०२३ रोजी आषाढी एकादशी गुरुवार या दिवशी कोणत्याही प्रकारची कुर्बानी करणार नाही तसेच त्याऐवजी शुक्रवार व शनिवार या दिवशी कुर्बानी करण्यात येईल असा निर्णय घेतला.मुस्लिम समाजानेलोकभावनेतुन  सर्व धर्मीयांनी एकमेकांना अशाच प्रकारचे सहकार्य करून राष्ट्रीय एकात्मता वाढीस समाजात एक जन संदेश देण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजाने घेतला या पत्रकावर जामा मस्जिद चे ट्रस्टी अमजद खान अमान खान, नगीना मशीद चे ट्रस्टी शेख अख्तर शेख रहेमान ,गौसिया मस्जिदचे ट्रस्टी  आरिफ शेख करीम, मदिना मज्जिदचे ट्रस्टी शेख अजित शेख रशीद मोमीन, ताजुशरीया मजीद चे  ट्रस्टी शेख कादिर शेख युसुफ, माजी नगरसेवक फिरोज खान हबीबुल्ला खान, बाजार समिती संचालक सय्यद अजगर सय्यद तुकडू, सय्यद खलील सय्यद नुरा ,शेख मुस्ताक शेख खलील ,शेख कलीम शेख जलीस या मुस्लिम बांधवांच्या सह्या आहे.

  मुस्लिम समाजाच्या या स्तुत्य निर्णयाचे पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण ,सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व आरोग्य प्रमुख सचिन चोळके व हिंदू बांधवांनी स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.