थोरगव्हाण येथे अमावस्या निमित्ताने रात्री कालभैरवाची सेवा
थोरगव्हाण येथे अमावस्या निमित्ताने रात्री कालभैरवाची सेवा
लेवाजगत न्यूज सावदा-येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथे असलेल्या जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ यांच्या मंदिरात गेल्या अकरा वर्षापासून तिसऱ्या प्रहरी म्हणजे रात्री नऊ वाजता काळभैरवनाथांची सेवा अमावस्येला केली जाते. या वेळी ही शनी अमावस्या निमित्त ही सेवा शनिवार रात्री नऊ वाजता होणार आहे. श्री स्वामी समर्थ सेवेकेऱ्यामार्फत ही सेवा प्रत्येक महिन्याच्या दर अमावस्येला केली जाते. हजारो भाविक या सेवेला महिला पुरुष, युवक, युवतीसह उपस्थित असतात. एक तास सुरू असलेल्या या सेवेस पुण्य फल लाभावे, यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन सेवेकऱ्या मार्फत करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत