अमावश्या निमित्ताने रविवारी सावदा येथील स्वामीनारायण मंदिरामध्ये सत्संगाचे आयोजन
अमावश्या निमित्ताने रविवारी सावदा येथील स्वामीनारायण मंदिरामध्ये सत्संगाचे आयोजन
लेवाजगत न्यूज सावदा- येथील श्री स्वामीनारायण मंदिरात वडताल धाम द्विशताब्दी महोत्सवानिमित्त दर महिन्याला अमावस्येला सत्संग होत असतो. या अमावस्येलाही रविवार सायंकाळी सत्संग आयोजित केला आहे. येथील जागृत पुरातन असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये नूतन कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी हे सद्गुरु शास्त्री भक्ती प्रकाश दासजी यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा मंदिराची धुरा सांभाळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १८ रोज रविवार संध्याकाळी सहा वाजेला अमावस्येच्या दुसऱ्या सत्संग मासिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी वक्ता श्री शास्त्री स्वामी श्रीजीप्रियदास जी यांच्या वाणीतून आपल्याला अमृत वचन देतील, असे कळवण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत