यावल तालुक्यात बकरीला बाईकचा धक्का लागल्याकारणावरून दंगल
यावल तालुक्यात बकरीला बाईकचा धक्का लागल्याकारणावरून दंगल
लेवाजगत न्यूज यावल-तालुक्यातील भालशिव येथे जि.प.शाळेसमोर बकरीला दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात दंगल घडली. त्यात आठ जणांनी मिळून चौघांना जबर मारहाण केली. दुचाकीची तोडफोड केली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांनी गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या गटाकडूनदेखील पाच जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली.
भालशिव येथे जि.प.शाळेजवळ बापू ऊर्फ विजय पुंडलिक सपकाळे (२७, रा.पिंप्री) हा तरुण दुचाकीने जात होता. त्याच्या दुचाकीचा धक्का बकरीला लागला. यावरून वाद वाढला. त्यात बापू सपकाळे, पुंडलिक सपकाळे, भास्कर सपकाळे व धर्मेंद्र सपकाळे यांना लक्ष्मण जानकीराम कोळी, नीलेश लक्ष्मण कोळी, कमलाकर रामा कोळी, सुनीताबाई लक्ष्मण कोळी, बापू नामदेव कोळी, रामा जानकीराम कोळी, देवडू नामदेव कोळी व आकाश निवृत्ती साळुंखे या आठ जणांनी जबर मारहाण केली. त्यात चौघांना दुखापत झाली. त्यांच्या मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत