मूंबईहुन येणारे ६४ लाखाचे सोने चोरटयांनी लांबवले
मूंबईहुन येणारे ६४ लाखाचे सोने चोरटयांनी लांबवले
लेवाजगत न्यूज धुळे -मुंबईहुन शहरात येणारे सुमारे ६४ लाखांचे सोने चोरट्यांनी लांबवले. ही घटना शनिवारी समोर आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
धुळे, जळगाव, नाशिक व नंदुरबार येथील काही सराफ मुंबईत खरेदी केलेले सोने जय बजरंग कुरिअरच्या माध्यमातून धुळे, नाशिक व नंदुरबारला आणत होते. ही जबाबदारी गोविंद सिकरवर नामक कर्मचाऱ्याकडे होती. गोविंदने नाशिक येथील सराफांचे ५० लाखांचे दागिने पोहचवले. त्यानंतर तो धुळ्याच्या दिशेने येत होता. या वेळी अज्ञात चोरट्याने गोविंदजवळ असलेल्या बॅगेतून ६४ लाख ८० हजारांचे सोने लांबवले. त्यानंतर त्याने कंपनीच्या वरिष्ठांना कळवले व पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सोने खरेदीच्या मूळ पावत्या मागितल्या. तसेच पडताळणीनंतर विष्णूसिह निनुआ शिकरवार (वय. ३२, रा. काळबादेवी, मुंबई ) याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत