नवीन पनवेलमध्ये मोटारीत मृतदेह
नवीन पनवेलमध्ये मोटारीत मृतदेह
प्रतिनिधी पनवेल:- नवीन पनवेल वसाहतीमध्ये सोमवारी दुपारी एका बंद मोटारीत मृतदेह आढळला. नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत खांदेश्वर पोलीस तपास करत आहेत. प्रशांत वर्मा असे मृत व्यक्तीचे नाव असून प्रशांत हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. वर्मा हे कुटूंबियांसोबत सेक्टर १६ येथे राहत होते.
सोमवारी दुपारी सेक्टर १७ येथील रस्त्यावर मारुती स्वीफ्ट मोटारीत (एमएच ०१ एई ७४९२) प्रशांत यांचा मृतदेह पाहील्यामुळे रहिवाशांमध्ये खळबळ माजली. प्रशांत यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच प्रशांत यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते समजणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक वैशाली गलांडे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत