धर्मांतर करण्यासाठी दबाव इंदूरच्या मौलवीसह ५जणांवर गुन्हा दाखल
धर्मांतर करण्यासाठी दबाव इंदूरच्या मौलवीसह ५जणांवर गुन्हा दाखल
वृत्तसंस्था इंदूर -येथील तरुणाने कोपरगाव शहरातील एका २० वर्षीय युवतीस प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केला. नंतर तिच्यावरील अतिप्रसंगाचे फोटो व व्हिडिओ तयार करून युवतीस ब्लॅकमेल करून पुन्हा इंदूर येथे बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिला नमाज पठण करायला लावून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याची घटना कोपरगाव शहरात उघडकीस आली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात इंदूरच्या मौलवीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील इम्रान अय्युब शेख व फय्याज (रा. कोपरगाव) या दोघांना कोपरगाव पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी कोपरगाव शहरातील २० वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सायम कुरेशी, (रा. जुना पिठा, इंदूर, मध्य प्रदेश) , इम्रान अय्युब शेख, (रा. कोपरगाव), कलीम उर्फ छोटू व फय्याज ( दोघे रा. कोपरगाव) व इंदूर येथील मौलवी अशा ५ जणांवर गुन्हा दाखल केला. पीडित युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके रवाना झाल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत