Contact Banner

अकोल्यात१९ वर्षीय मुलाचे केले धर्मांतर

 

Akōlyāta-19-varṣīya- mulāchē-kēlē-dharmāntara

अकोल्यात१९ वर्षीय मुलाचे केले धर्मांतर 

वृत्तसंस्था अकोला -शहरात एका मुलाचे धर्मांतर केल्याचा प्रकार उजेडात आला असून चान्नी पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ‘तुमचा मुलगा मुस्लिम धर्मात आला असून तुम्हीही मुस्लिम धर्मात या’ असे आरोपी फिर्यादीला म्हणाल्याचे ‘एफआयआर’मध्ये नमूद आहे. मुलाकडे मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे दस्तऐवज आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Akōlyāta-19-varṣīya- mulāchē-kēlē-dharmāntara

    आलेगाव येथील या कुटुंबात पती-पत्नी, दोन मुले, एक मुलगी असून मोठा मुलगा सुनील (नाव बदलले आहे) हा १९ वर्षांचा असून तो अल्ताफ गादीवाले, अन्सार गादीवाले यांच्या संपर्कात आला होता. त्यांनी त्याला हैदराबाद येथे कामाला नेतो, असे सांगून बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री येथील मदरशामध्ये ठेवले. मात्र, अनेक दिवस मुलाचा फोन न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी अल्ताफ, अन्सार व संबंधिताकडे विचारणा केली. मात्र त्यांनी उडावा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ते मुलाच्या शोधासाठी हैदराबाद येथे गेले. सिकंदराबाद येथून मुलाशी फोनवर संपर्क साधला. मात्र त्याने तुम्ही घरी परत जा, असे सांगितले. त्यामुळे आई-वडील परत आलेगाव येथे आले.

    काही दिवसांनी त्याच्या आई-वडिलांनी मुलाला संपर्क साधला. त्या वेळी दुसऱ्याच एकाने फोन उचलून फोनवर आम्ही या मुलाला आेळखत नसून येथे त्याला मोहंमद अली असे म्हणत असल्याचे सांगितले. संबंधिताने आपण उंद्री येथील मदरशातून बोलत असल्याचेही सांगितले. दुसऱ्या दिवशी मुलाचे आई-वडील उंद्री येथील मदरसामध्ये गेले असता त्यांना तेथे मुलगा दिसला. त्याने तेव्हा घरी येण्यास नकार दिला. तो दुसऱ्या दिवशी घरी परतला. मुलाच्या खिशात त्याने मुस्लिम धर्म स्वीकारल्याबाबतचा दस्तावेज आढळल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.