अदाणी डहाणू पॉवर स्टेशन व अदाणी फाऊंडेशनच्या पुढाकाराने स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी, "स्वाभिमान" केंद्राची सुरवात
अदाणी डहाणू पॉवर स्टेशन व अदाणी फाऊंडेशनच्या पुढाकाराने स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी, "स्वाभिमान" केंद्राची सुरवात
लेवाजगत न्युज डहाणू:-
'डहाणूतील महिलांना सक्षम बनविण्यासाठी "स्वाभिमान" या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योजकतेचा मार्गक्रमण निश्चित करेल. या विशेष दिवशी उद्योजकतेच्या या गटाला, विशेषत: महिलांना शुभेच्छा देत, अदाणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रिती जी. अदाणी यांनी उपक्रमाचे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या.'
पालघर: डहाणू, २१ जुलै २०२३ – अदाणी इलेक्ट्रिसिटी डहाणू आणि अदाणी फाऊंडेशनने "स्वाभिमान" या प्रकल्पाच्या अंतर्गत डहाणू येथील ऊर्जा प्रकल्पाजवळच्या सरावली गावात स्वयं-सहायता गटाच्या (SHGs) महिलांना सक्षम बनविण्यासाठी शर्ट निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे.
"स्वाभिमान" केंद्राची कल्पना ही सरावली गावातील दृढनिश्चयी महिलांच्या गटाने केलेल्या आवाहनाने प्रत्यक्षात आली आहे. या महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना, इतर कामासाठी कमी पडणार्या वेळेच्या समस्येला तोंड देत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यातील काही महिला नजीकच्या कपडे तयार करणार्या कारखान्यांमध्ये नोकरीचा प्रयत्नही केला होता. तर काही महिला घरीच शिलाई मशीनवर काम करत होत्या. परंतु त्यांना नियमीत व निश्चित उत्पन्न मिळत नव्हते.
या महिला गटाची अंतर्निहित क्षमता ओळखून अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनने त्यांना सहकार्य करण्यासाठी सक्रियपणे पाऊल टाकत, उंबरगाव येथील एका कपडे निर्मिती कारखान्याचे मालक श्री. दीपक नायर यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सरावली गावात शर्ट स्टिचिंग केंद्र स्थापन करण्याची एक परिवर्तनीय योजना आखली. त्याचेच मूर्त रूप "स्वाभिमान" हे नवे केंद्र आहे. याबाबतच्या कल्पनेला मोठा प्रतिसाद मिळून या उपक्रमाला सर्वांचेच सहकार्य लाभले.
'स्वाभिमान केंद्र' हे महिला गटाच्या ३० महिलांच्या सामूहिक योगदानाने साकार झाले आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाऊंडेशनने संयुक्तरित्या दिलेल्या अतुलनीय सहकार्याने एक नवी महत्त्वपूर्ण अशी संस्था यानिमित्ताने अस्तित्वात आली आहे.
अदाणी डहाणू थर्मल पॉवर स्टेशनचे मुख्य परिचलन अधिकारी (सीओओ) श्री. राजेंद्र नंदी हे या कार्यक्रमास उपस्थित होते. "या उपक्रमाला आमचे पूर्णत सहकार्य असेल आणि या वंचित महिलांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी शाश्वत उपजीविका मिळण्याच्या दृष्टिने `स्वाभिमान’ हे एक उत्तम व्यासपीठ असेल, याची मला खात्री आहे." असे प्रतीपादन केले.
अदाणी फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक श्री. वसंत गढवी या उपक्रमाबाबत म्हणाले की, "स्वाभिमान हा प्रकल्प ग्रामीण भागातील वंचित महिलांना प्रशिक्षण, सहभाग, आर्थिक साक्षरता, व्यवसाय योजना आणि निश्चित अशा उपलब्ध सुविधेद्वारे एक व्यासपीठ प्रदान करेल. या उपक्रमात इच्छुक उद्योजकांचा समावेश आहे. तसेच सहभागींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम सक्षमता प्रदान करेल. हा उपक्रम व्यवसाय नियोजन, बाजार संशोधन, आर्थिक व्यवस्थापन, कच्चा माल खरेदी, उत्पादन व्यवस्थापन आणि विपणनासाठी आवश्यक समर्थनासह मुख्य कौशल्य प्रशिक्षणपूरक असा आहे.
अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाऊंडेशनने या नवीनतम स्वाभिमान केंद्राला २९ शिलाई मशीन दिल्या आहेत. महिला गटाच्या ३० महिलांना सर्वसमावेशक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले गेले आहे. कारखान्यातून कापड साहित्य मिळवण्यापासून ते तयार वस्तूंच्या वितरणापर्यंत हे केंद्र शर्ट बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया सुलभ करते. परिणामी येथे कार्य करणाऱ्या महिला या स्थिर दैनंदिन उत्पन्न मिळण्यासाठी आता सक्षम बनतील.
सामाजिक दायित्व म्हणून अदाणी फाऊंडेशन आणि अदाणी इलेक्ट्रिसिटीने या स्वाभिमान केंद्रात प्रशिक्षण, शिलाई मशिनसाठी लागणारी गुंतवणूक तसेच उत्पादन प्रक्रिया व्यवस्थापन, दस्तऐवजीकरण, लेखा आणि या केंद्राचा विकास यासाठी आवश्यक अशा आधार आणि खर्चाची जबाबदारी घेतली आहे. यासाठीच्या सहयोगी प्रयत्नात, महिला गट हा मासिक आवर्ती खर्च जसे की - वीज बिल आणि दैनंदिन विविध खर्चासाठी योगदान करेल. या केंद्राच्या लेखा, प्रशासन, गुणवत्ता आणि उत्पादन कार्यात प्रशिक्षण घेणाऱ्या गटातील दोन महिलांची फाऊंडेशनने नियुक्तीदेखील केली आहे.
स्वाभिमान केंद्राची स्थापना ही स्थानिक समुदायांच्या उन्नतीसाठी, शाश्वत उपजीविकेच्या गतीला चालना देण्यासाठी आणि संबंधित क्षेत्रातील रहिवाशांच्या जीवनमानात लक्षणीय वाढ करण्यासाठीच्या अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या अटल वचनबद्धतेचे प्रतिबिंबच आहे.
अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडविषयी:
अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, हा अदाणी समूहाचा वैविध्यपूर्ण भाग असून ही ऊर्जा निर्मिती, पारेषण व किरकोळ वीज वितरण, अशा एकात्मिक उद्योगात कार्यरत आहे. एईएमएलची भारतातील सर्वात मोठ्या व सर्वाधिक प्रबळ वीज वितरण जाळ्यावर मालकी आहे. एईएमएल मुंबई व उपनगरातील ४०० चौरस किमीवरील ३१ लाख ग्राहकांना सेवा देते. त्याद्वारे २००० मेगावॉट वीज मागणी ९९.९९ टक्के विश्वासार्हतेसह पूर्ण केली जाते. हा आकडादेखील देशात सर्वाधिक आहे. एईएमएल अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वोत्तम ग्राहक काळजी सेवा देते. अधिक माहितीसाठी कृपया www.adanielectricity.com येथे भेट द्या.
अदाणी फाऊंडेशनबद्दल:
अदाणी फाऊंडेशन, अदाणी समूहाची सामुदायिक समर्थन आणि प्रतिबद्धता शाखा, संपूर्ण भारतामध्ये शाश्वत परिणाम साध्य करण्यासाठी धोरणात्मक सामाजिक गुंतवणूक करण्यासाठी समर्पित आहे. १९९६ पासून फाऊंडेशनने शिक्षण, आरोग्य, शाश्वत उपजीविका, कौशल्य विकास आणि सामुदायिक पायाभूत सुविधांसह मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांवर (एसडीजी) आधारित आपल्या धोरणांसह, फाउंडेशन तिच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनासाठी आणि टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जाते, जे अदाणी समूहाच्या व्यवसायाच्या आसपासच्या समुदायांच्या कल्याणासाठी आणि संपत्तीसाठी योगदान देते. सध्या अदाणी फाऊंडेशन, १९ राज्यांमधील ५६७५ गावांमध्ये कार्यरत असून, ७६ लक्ष लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत