अजिंठ्याच्या सात कुंडात सेल्फी काढतांना तरुण पडला,सुखरूप काढले बाहेर
अजिंठ्याच्या सात कुंडात सेल्फी काढतांना तरुण पडला,सुखरूप काढले बाहेर
लेवाजगत न्यूज फर्दापूर-गावातील १० मित्रांसह गोपाल पुंडलिक चव्हाण (२७, रा. नांदातांडा, ता. सोयगाव) हा जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी रविवारी आला होता. दरम्यान, दुपारी १ वाजता हे सर्व मित्र येथील सातकुंडाच्या धबधब्यावर सेल्फी काढत होते. अशातच गोपाल चव्हाणचा सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून तो धबधब्याच्या पहिल्या कुंडात ७० फूट खोल पडला हे मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. यामुळे येथील छायाचित्रकारांसह काही व्यावसायिक धावून आले. खाली पाणी असल्याने सुदैवाने गोपालला कोणतीही इजा झाली नाही. भारतीय पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी, पोलिसांनी २ तासांनी दोरीच्या सहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढले. यापूर्वी अशीच घटना : यापूर्वी १७ सप्टेंबर २०२१ रोजी जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी देवांशू मौर्य (२१, रा. नालासोपारा) हा याच कुंडात पडला होता. त्याला सुखरूप बाहेर काढले होते. दरम्यान, सातकुंड परिसराला वरील बाजूस सुरक्षा कठडे नाही. अजिंठा वन विभागाने येथे सुरक्षेसाठी कर्मचारी नेमावा, तातडीने वरील बाजूस कठडे बसवावेत, अशी मागणी पर्यटकांनी केली. गोपालला दोरीच्या साहय्याने बाहेर काढले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत