जेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांच्या 'गझल सोहळा ' या गझल संग्रहाचे प्रकाशन सोहळा संपन्न
जेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांच्या 'गझल सोहळा ' या गझल संग्रहाचे प्रकाशन सोहळा संपन्न
उरण (सुनिल ठाकूर )डिंपल प्रकाशन मुंबई (वसई) व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ( दहिसर शाखा) यांचे संयुक्त विद्यमाने जेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांच्या 'गझल सोहळा ' या गझल संग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त शायर डाॅ. संदीप गुप्ते यांचे हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यास प्रा. गिरीश साळवे , प्रा. आनंद देवडेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.डॉ . संदीपगुप्ते यांनी , माणुसकी जपणारा ज्येष्ठ गझलकार क्रुतज्ञता जपणारा श्रेष्ठ गझलकार ,असे गौरवोद्गार सुनील ओवाळ यांनी काढले .
प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम भगत यांनी केले. नंतर डॉ.संदीप गुप्ते गुप्तयांच्याअध्यक्षतेखाली गझल मैफल संपन्न झाली.संचालन सुनीलओवाळ यांनी केले.भागवत बनसोडे यांच्या पंचाहत्तरी निमित्त सद्धम्म साहित्य संघाच्या वतीने त्यांना मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत