Contact Banner

भाजपा कार्यकर्त्यांनी केली मनोरुणावर लघवी ,गुन्हेगाराला सोडणार नाही मुख्यमंत्री

BJP-workers-made-the-Chief-Minister-will-not-release-the-urine-on-the-temporary-criminal


 भाजपा कार्यकर्त्यांनी केली मनोरुणावर लघवी गुन्हेगाराला ,सोडणार नाही मुख्यमंत्री 

वृत्तसंस्था सिधी -मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात भाजपच्या एका कार्यकर्त्याने दारूच्या नशेत मनोरुग्ण व्यक्तीवर लघवी केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भाजप कार्यकर्ता प्रवेश शुक्ला हा भाजपचे आमदार पं. केदारनाथ शुक्ला यांचा माजी प्रतिनिधी होता.

BJP-workers-made-the-Chief-Minister-will-not-release-the-urine-on-the-temporary-criminal


    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 9 दिवस जुना कुबरी बाजारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये भाजप कार्यकर्ता परवेश शुक्ला एका व्यक्तीवर लघवी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रवेश शुक्ला देखील मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कुबरी गावातील रहिवासी असलेला प्रवेश शुक्ला हा आमदार पं. केदारनाथ शुक्ला यांचा प्रतिनिधी होता. सध्या तो भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिद्धी अंजुलता पटले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही या व्हिडीओतील व्यक्ती कोण आहे याचा तपास करत आहोत.

   गुन्हेगाराला सोडणार नाही - मुख्यमंत्री

   मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सीधी जिल्ह्यातील व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आहे. दोषीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कडक कारवाई करणार. दोषीवर NSA देखील लावला जाईल असे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.