धुळे हादरले १५ ठार -बस स्थानकातील प्रवाशांना उडवत कंटेनर हॉटेल मध्ये घुसला
धुळे हादरले १५ ठार -बस स्थानकातील प्रवाशांना उडवत कंटेनर हॉटेल मध्ये घुसला
धुळे प्रतिनिधी- भरधाव वेगातील एक कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने जवळपास १५ जण ठार झाल्याची भयावह घटना धुळे जिल्ह्यातील मुंबई - आग्रा महामार्गावर घडली आहे. या अपघातात जवळपास २८ जण जखमी झालेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
यासंबंधीच्या प्राथमिक माहितीनुसार, धुळ्यातील मुंबई - आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ मंगळवारी सकाळी १०.३०वा. हा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव वेगातील १४चाकी कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरला. त्यात १५ जणांचा चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
यासंबंधीच्या माहितीनुसार, महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या जवळ असलेल्या भागात मोठा उतार आहे. या उतारावर मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते. त्यानंतर हा कंटेनर थेट पळासनेर गावाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. या कंटेनरने अन्य काही काही वाहनांनाही धडक दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गाडीतील काही जणांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत