Contact Banner

भुसावळ अमृत योजनेची थेट मोदीजींकडे तक्रार ,ठेकेदार कंपनीस ब्लॅक लिस्ट करा-शिशिर जावळे

Bhusawal-Amrit-Yojen-Complaint-Directly-to-Modiji,-Contractor-Company-Blacklist-Shishir-Jawle


भुसावळ अमृत योजनेची थेट मोदीजींकडे तक्रार ,ठेकेदार कंपनीस ब्लॅक लिस्ट करा-शिशिर जावळे 

लेवाजगत न्यूज भुसावळ-शहरात ९० कोटी रुपये खर्चाच्या अमृत‎ योजनेच्या पहिल्या टप्प्याची शासकीय‎ मुदत संपल्यानंतर ,‎ तब्बल चार वेळा मुदतवाढ देऊनही या‎ टप्प्यातील कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे‎ प्रलंबित कामांचा टप्पा-२मध्ये समावेश‎ करण्यात आला. पण, त्यास अद्याप मंजुरी‎ नाही.  पालिकेने‎ टप्पा-२ची सर्व प्रक्रिया वेळेत झाली तर‎ मार्च २०२५ मध्ये योजनेतून भुसावळकरांना‎ पाणी मिळेल, असे म्हटले जात आहे.सदर अमृत योजनेस खालील प्रमाणे मुदतवाढ‎ दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ रोजी‎ ठेकेदाराला कार्यारंभ‎ आदेश देण्यात आले‎ होते.‎ २४ महिन्यात म्हणजेच‎ २५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत‎ ही कामे पूर्ण होणे‎ अपेक्षित होते. मात्र तसे‎ झाले नाही. यामुळे ४‎ मार्च २०२० रोजी १२ महिने‎ मुदतवाढ दिली. तरीही‎ काम पूर्ण न झाल्याने २७‎ नोव्हेंबर २०२१ रोजी पुन्हा‎ १२ महिने मुदतवाढ‎ देण्यात आली.‎ दोनवेळा दिलेल्या‎ मुदतवाढीत देखील अमृत‎ योजनेच्या पहिल्या‎ टप्प्याची कामे पूर्ण नाही.‎ यामुळे ३१ जुलै २०२२‎ पर्यंत वेळ वाढवून देण्यात‎ आली. त्यात चौथ्यांदा‎ पुन्हा ३१ मार्च २०२३ पर्यंत‎ वाढ करण्यात आली‎ होती.‎तरीदेखील अमृत योजना रखडलेली आहे. मुबलक पाणी असताना देखील भुसावळ नगरपालिकेच्या  नियोजन शून्य कारभारामुळे भुसावळ शहरात प्रचंड पाणी टंचाई  समस्या सातत्याने भेडसावत आहे कुठल्याही प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वण वण भटकावे लागत आहे. असे असताना देखील  अमृत योजनेच विहित मुदतीत काम न करणाऱ्या  कंपनीला ठेकेदाराला  वेळोवेळी जाणून-बुजून मुद्दाम मुदतवाढ का देण्यात येते?? त्या कंपनीला ठेकेदारांना मुदतवाढ देऊनही अमृत योजनेची काम का पूर्ण होत नाहीत? अमृत योजनेच्या टेंडरची रक्कम वाढवण्यासाठी तर ही केलं जात नसेल ना ?यामागे  अर्थकारण तर नाहीं न ? आणि प्रशासन अशा ठेकेदारांना कंपनीला कोण पाठीशी  घालत आहे?? यांचा वाली कोण आहे? अमृत योजनेच्या विलंबास जे कोणी जे प्रशासकीय अधिकारी तसेच जबाबदार ठेकेदार कंपनी यांची सर्वांची  उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित योजनेचे  ठेकेदार कंपनीस ब्लॅकलिस्ट करावे अशी मागणी भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याच त्यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविलेले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.