वॉकिंग करताना विश्रांतीसाठी विहिरीच्या कठड्यावर बसताना तोल गेल्याने ,कोरड्या विहिरीत पडल्यामुळे शिक्षकाचा मृत्यू
वॉकिंग करताना विश्रांतीसाठी विहिरीच्या कठड्यावर बसताना तोल गेल्याने ,कोरड्या विहिरीत पडल्यामुळे शिक्षकाचा मृत्यू
लेवाजगत न्यूज यावल -शहरातील भुसावळ रस्त्यावरील बालाजी मंदिरासमोरील कोरड्या विहिरीत पडून वाघझिरा आश्रम शाळेतील ४५ वर्षीय शिक्षकाचा मृत्यू झाला. नितीन छगन निंबाळे असे मृताचे नाव आहे. ते या भागात वॉकिंगसाठी गेले होते.
हेही वाचा-फैजपूर शहरातील मोरे कुटूंबावर शोककळा,एकाच दिवशी आजी व नातवाची अंत्ययात्रा 👉https://www.lewajagat.com/2023/07/Mourning-over-the-More-family-in-Faizpur-city-funeral-of-grandmother-and-granddaughter-on-the-same-day.html
यादरम्यान विश्रांतीसाठी विहिरीच्या कठड्यावर बसताना त्यांचा अचानक तोल गेला. नितीन निंबाळे यावल शहरात भुसावळ रस्त्यावर श्री बालाजी मंदिर आहे. या मंदिरासमोर कोरडी विहिर आहे. या परिसरात नितीन छगन निंबाळे (रा. बालाजी सिटी) हे वॉकिंग करत होते. यावेळी ते विहिरीच्या कठड्यावर जाऊन बसले. पण, तोल गेल्याने विहिरीत पडले. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. नितीन यांना विहिरीतून काढण्यात आले. पण, विहिर कोरडी असल्याने त्यात पडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपवला. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते वाघझिरा येथील आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मिलिंद मिस्तरी यांच्या खबरीवरून यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत