Header Ads

Header ADS

घोरपड, साप हातात घेऊन मिसेस उपमुख्यमंत्री सांगतायत कोणता प्राणी सर्वात विषारी?; नेटकरी म्हणाले, “घरातच…”

 

Ghorpad,-taking-a-snake-in-hand-Mrs-Deputy-Chief-Minister-says-which-animal-is-the-most-venomous?;- Netkari-said,-"At home"

घोरपड, साप हातात घेऊन मिसेस उपमुख्यमंत्री सांगतायत कोणता प्राणी सर्वात विषारी?; नेटकरी म्हणाले, “घरातच…”

मनोरंजन वार्ता-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्या प्रत्येक विषयावर आपलं परखड मत मांडतात. यामुळे त्या कधी कधी ट्रोलही खूप होतात. नुकतीच अमृता फडणवीस यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

Ghorpad,-taking-a-snake-in-hand-Mrs-Deputy-Chief-Minister-says-which-animal-is-the-most-venomous?;- Netkari-said,-"At home"


हॅशटॅग फ्रायडे वाइब्स आणि फ्रायडे फिलिंग लिहित अमृता फडणवीस यांनी “सर्वात धोकादायक, विषारी आणि क्रूर प्राणी हा फक्त माणूस आहे,” असं लिहिलं आहे. तसेच याबरोबर त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये त्यांनी हातावर घोरपड घेतलेली दिसतं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी दोन्ही हातात साप पकडले आहेत.

    अमृता फडणवीसांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. एक नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “सध्या एक माणूस महाराष्ट्रात विषय पसरवतोय, ते किती जहाल आहे ते दिसतंयच. एक दिवस ते विषय त्यालाच डसेल.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “मी काय म्हणतो, संजय राऊत यांच्याकडे आपलाच साप गेला होता की काय?” तसेच तिसऱ्यानं लिहिलं की, “माणूस नावाच्या प्राण्यांपेक्षा हे बरेच… माणूस पुन्हा येण्यासाठी किती विषारी बनू शकतो हे महाराष्ट्र बघतोय.” तर चौथ्यानं नेटकऱ्यानं लिहिलं की, “घरात एक साप असताना दुसऱ्या सापाची काय गरज?”

      मिसेस फडणवीसांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टला अवघ्या काही तासांत १ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर १५०हून अधिक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.