गटारीचं खरं नाव व अर्थ काय? यंदा श्रावणाआधी ‘या’ दोन दिवशी नॉनव्हेजवर ताव मारता येणार
गटारीचं खरं नाव व अर्थ काय? यंदा श्रावणाआधी ‘या’ दोन दिवशी नॉनव्हेजवर ताव मारता येणार
शोध वार्ता-श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. आषाढ अमावस्येनंतर यंदा तब्बल ५९ दिवसांचा श्रावण महिना असणार आहे आषाढ अमावस्या ही दीप अमावास्यां या नावाने सुद्धा ओळखली जाते. दीप अमावास्येला विशेषतः दिव्यांचे पूजन केले जाते. याशिवाय या दिवसाची आणखी एक ओळख म्हणजे ‘गटारी’ अमावास्या. मुळात गटारी हे नाव त्याच्या मूळ शब्दाचा प्रचंड अपभ्रंश होत पडलं आहे. गटारी या शब्दाची व्युत्पत्ती ही गतहारी या शब्दापासून झाली आहे. गत म्हणजे मागे सारलेला/सोडलेला आणि हारी म्हणजे आहारी या शब्दांपासून गतहारी अमावस्या हा शब्द तयार झाला आणि पुढे त्याचा बोलीभाषेतील अपभ्रंश होत गटारी असे म्हणायला सुरुवात झाली.
गटारीचा खरा अर्थ काय?
आता गटारीला गतहारी तरी का म्हणत असतील, तर आपल्याला माहीत आहे की आषाढ अमावास्येपासून पुढे चातुर्मासात मांसाहार किंवा कांदा, लसूण असे पदार्थ वर्ज्य केले जातात. याचे एक कारण म्हणजे पावसाच्या चार महिन्यांच्या या काळात मासेमारी बंद असते शिवाय शेताची कामेही सुरु असल्याने एरवी वर्षभर खाल्ले पाजणारे पदार्थ तितक्याच मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील असे नाही. म्हणूनच काही प्रमाणात निर्बंध येत असत यामुळेच वर्षभरात केला जाणारा आहार मागे सोडून चातुर्मासात वेगळ्या पद्धतीचा आहार घेण्याची ही सुरुवात असते म्हणून ही अमावस्या व हा दिवस गतहारी अशा नावाने ओळखला जातो. श्रावण सुरु होण्याच्या एक दिवस आधी मात्र नॉनव्हेजवर जोरदार ताव मारला जातो.
गटारी २०२३ शेवटची तारीख
यंदा कालनिर्णयानुसार १८ जुलैला श्रावण सुरु होत आहे. त्याआधी १७ जुलैला आषाढी/सोमवती/दीप/ गतहारी अमावस्या असणार आहे. याआधीचा संपूर्ण वीकेंड म्हणजेच शुक्रवार १४ जुळत ते रविवार १६ जुलै पर्यंत तुम्ही मांसाहार करू शकता. यात काही घरांमध्ये शनिवार नॉनव्हेज वर्ज्य असते त्यामुळे १४ व १६ जुलै हे गतहारी सेलिब्रेशनचे दिवस असतील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत