आयटी कंपनीच्या एमडी व सीईओची कार्यालयात घुसून सिनेस्टाईल हत्या, तलवारीने केले वार
आयटी कंपनीच्या एमडी व सीईओची कार्यालयात घुसून सिनेस्टाईल हत्या, तलवारीने केले वार
वृत्तसंस्था बंगळुरू-कर्नाटकमधील बंगळुरू येथे मंगळवारी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील एका आयटी कंपनीतील एमडी आणि सीईओची कार्यालयात घुसून सिनेस्टाईल हत्या करण्यात आली आहे. आरोपीने हातात तलवार आणि चाकू घेऊन कार्यालयात प्रवेश केला आणि दोघांची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी याच कंपनीचा माजी कर्मचारी असल्याचं बोललं जात आहे.
फणींद्र सुब्रमण्यम आणि विनू कुमार असं हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत. फणीद्र सुब्रमण्यम हे ‘एरोनिक्स इंटरनेट कंपनी’चे एमडी होते. तर विनू कुमार हे याच कंपनीचे सीईओ होते. बेंगळुरूमधील अमृतहल्लीजवळ ही दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी हा ‘एरोनिक्स इंटरनेट कंपनी’चा माजी कर्मचारी आहे. संशयिताने कंपनी सोडल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. तथापि, आरोपीचा मृत एमडी फणींद्र सुब्रमण्यम यांच्यावर तीव्र राग होता. सुब्रमण्यम यांनी आरोपीच्या उद्योग पद्धतीचा विरोध केला होता. याच रागातून ही हत्या केल्याचं बोललं जात आहे.
आज (मंगळवार) दुपारी चारच्या सुमारास संशयित आरोपी तलवार आणि चाकू घेऊन ‘एरोनिक्स’च्या कार्यालयात घुसला होता. यावेळी त्याने फणींद्र सुब्रमण्यम आणि विनू कुमार यांना भोसकलं आणि घटनास्थळावरु पळ काढला. जखमींना रुग्णालयात घेऊन जाताना दोघांचाही मृत्यू झाला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत