Contact Banner

खुशीने मुली पैश्यासाठी व्यवसाय करतात ,पोलिसांकडे तक्रारच नसेल तर काय करणार?एस्कॉर्ट एजंटशी सेवे साठी बिनधास्त बोला

Khushine-girls-do-business-for-money-so-what-if-no-complaint-to-the-police?-talk-to-an-escort-agent-for-service


खुशीने मुली पैश्यासाठी व्यवसाय करतात ,पोलिसांकडे तक्रारच नसेल तर काय करणार?एस्कॉर्ट एजंटशी सेवे साठी बिनधास्त बोला

छत्रपती संभाजी नगर वृत्तसंस्था- एकांतात किंवा पार्टी वा उच्चभ्रू समारंभात सोबत म्हणून दिली जाणारी "एस्कॉर्ट सर्विस' आता देहविक्रयाचा "सोफिस्टिकेटेड' मार्ग ठरत आहे. छत्रपती संभाजीनगमध्ये अशा सेवा देणाऱ्या २०० हून अधिक वेबसाईट्स आहेत. संपर्क करताच व्हॉटस्अॅपवर मुलींचे रेटकार्ड, "सुविधा' व फोटो येतात. मुलगी निवडल्यावर ती "स्लॉट' प्रमाणे ग्राहकाच्या पत्त्यावर पाेहचते. हा धंदा इमानेइतबारे चालत असल्याने तक्रारी येत नाहीत. "दिव्य मराठी'च्या स्टिंगमधून ही बाब उघडकीस आली.

     उद्देश फक्त सोबत हवी म्हणून...

एखादी व्यक्ती सोबत फिरण्यासाठी, हॉटेलमध्ये जेवणासाठी, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, व्यावसायिक बैठकांमध्ये सोबत करण्यासाठी तसेच फक्त गप्पा मारण्यासाठी तगडी रक्कम मोजून "एस्कॉर्ट' ची सेवा घेतोे. यात शारिरीक संबंध अपेक्षित नाहीत. तर फक्त काही वेळ सोबत व काही प्रसंगात स्वत:चे महत्त्व वाढावे म्हणून पैसे दिले जातात. मात्र, "एस्कॉर्ट सर्विसेस'च्या नावाखाली खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. यासाठी तासाला १० हजारांपासून २४ तासांसाठी ५० हजारपर्यंत पैसे आकारले जातात. दिव्य मराठी प्रतिनिधीने ग्राहक बनून एजंटांशी संवाद साधला. यातून धक्कादायक माहिती समोर आली.

Khushine-girls-do-business-for-money-so-what-if-no-complaint-to-the-police?-talk-to-an-escort-agent-for-service


    तक्रार आली तर गुन्हे दाखल करू

हे प्रकार संगनमताने होत असल्याने तक्रारी येत नाहीत. काही प्रकरणात फसवणूक होवूनही बदनामीच्या भितीने वाच्यता होत नाही. तक्रार आली तर नक्कीच कारवाई करू व अशा वेबसाईट्सचाही शोध घेवू, असे सायबर सेलच्या पोलिस निरीक्षक प्रविणा यादव म्हणाल्या.

     एस्कॉर्ट सेवेची विचारणा करण्यासाठी तीन एजंटशी साधला संवाद, मग असे फुटले या व्यवसायाचे बिंग

केस 1 : काय करायचे ते तुम्ही ठरवा

प्रतिनिधी : फ्रेशर्स पार्टीसाठी एस्कॉर्ट हवी आहे.

एजंट : मुलगी निवडा. ती आल्यावर काय करायचे ते तुम्ही ठरवा.

प्रतिनिधी : फक्त पार्टीत न्यायचे आहे.

एजंट : तेच सांगतोय. ही मुलगी तुम्हाला सर्व प्रकारच्या सेवा देईल.

प्रतिनिधी : यात काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना?

एजंट : सर्व मुली हायफाय. ओळखूही येणार नाही बाहेरची म्हणून.

     केस 2 : आवडली तरच पैसे द्या

एजंट : कोठे हवी आहे एस्कॉर्ट सेवा?

प्रतिनिधी : जालन्यात, पुढील आठवड्यात हवी आहे.

एजंट : आम्ही देशभर सेवा देतो. कोणती फायनल केली?

प्रतिनिधी : सहकाऱ्यास हवी आहे. त्यांना विचारून कळवतो.

एजंट : चालेल त्यांना फोटो फॉरवर्ड करून टाका.

प्रतिनिधी : हॉटेलमध्ये न्यायचे असल्यास वेगळे पैसे लागतील का?

एजंट : नाही. ते यातच समाविष्ट आहेत. हॉटेल आम्हीच बुक करू.

प्रतिनिधी : काही अॅडव्हान्स पैसे द्यावे लागतील का?

एजंट : गरज नाही. काम झाल्यावर सेवा आवडली तरच पैसे द्या.

     केस 3 : स्वखुशीने व्यवसायामध्ये

प्रतिनिधी : आमची पहिलीच वेळ आहे. पुढे काही त्रास तर नाही?

एजंट : कोणता त्रास?

प्रतिनिधी : पोलिसांचा किंवा भविष्यात बदनामीचा, ब्लॅकमेलिंग?

एजंट (हसत) : आमच्या मुली स्वखुशीने, पैशासाठी हा व्यवसाय करतात. तक्रार नसेल तर पोलिस काय करतील? मुलींनी गडबड केली तर पुढे त्यांना काम मिळेल का? ग्राहक मोडून कसे चालेल?

प्रतिनिधी : मुली खऱ्या आहेत का? की मॉडेलचे फोटो पाठवलेत?

एजंट : तुम्ही ४०० रुपये पाठवा गुगल पेवर. मग अजून फोटो पाठवतो. एकही फोटो चुकीचा नाही. सर्व कॉलेजच्या मुली आहेत.

    रेट ताशी १० हजार, दिवसाला ५० हजार; छत्रपती संभाजीनगरात सेवा देणाऱ्या २०० वर वेबसाइट

1. सोशल मिडीयावर “एस्कॉर्ट सर्विसेस’ वेबसाईट्सच्या जाहिराती येतात. एसएसएसद्वारेही लिंक पाठवल्या जातात. गुगलवर “एस्कॉर्ट सर्विसेस इन औरंगाबाद’ असे टाईप करताच २०० हून अधिक साईट दिसतात. मोठी शहरे, महानगरांत सेवा देणाऱ्यांच्या हजारो वेबसाईट.

2. या बहुतांश वेबसाईट प्रामुख्याने महिलांच्या नावाने आहेत. त्यावर साेशल मीडिया साईट प्रमाणे मुलीचे फोटो आहेत. क्लिक करताच फोटो मोठा होऊन मुलीचे वय, रंग, बांधा, ऊंची, वजन, डोळे अन केसांचा रंग आणि तासाप्रमाणे दर असा तपशील येतो.

3. काही संकेतस्थळावर रेटकार्ड आहे. हे फोटो खोटे असल्याचे वाटतात. प्रत्येक फोटोसमोर एकच वाॅट्सअॅप क्रमांक असतो. त्यावर संपर्क साधताच एजंट सक्रिय होतात.

4. १५ ते २० मुलींचे फोटो गुगल व फोनपे नंबर पाठवतात. मुलगी निवडून फायनल करण्यास सांगतात. उत्तर देण्यास उशीर झाला तर थेट वॉट्सअॅप कॉल करून विचारणा करतात.

संदर्भ:-दिव्यमराठी (DB)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.