राज व उद्धव एकत्र येण्यासाठी लागले बॅनर,ठाकरे कुटुंबियांनी भूतकाळाकडे दुर्लक्ष करून एकत्र येण्याची वेळ
राज व उद्धव एकत्र येण्यासाठी लागले बॅनर,ठाकरे कुटुंबियांनी भूतकाळाकडे दुर्लक्ष करून एकत्र येण्याची वेळ
लेवाजगत न्यूज उल्हासनगर -मुंबईपाठोपाठ महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय उलथापालथीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याची विनंती करणारे बॅनर्स आता उल्हासनगरमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. उल्हासनगर मध्ये सुभाष हटकर नावाच्या मनसे कार्यकर्त्याने असे बॅनर लावल्याने चर्चा रंगली आहे.
एक वर्षापूर्वी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्ता काबीज केली होती. वादाच्या भोवऱ्यात असताना राज्यात वर्षभरात सरकार सुरळीत चालले, मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी आपल्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. यात अजित पवार आता उपमुख्यंत्री झाले आहेत.
राजकीय उलथापालथ पाहता मुंबईपाठोपाठ आता उल्हासनगरमध्येही ठाकरे कुटुंबीयांनी भूतकाळाकडे दुर्लक्ष करून एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे बॅनर लावले जात आहेत. यावरून महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याचा आग्रह करत असल्याचे स्पष्ट दिसते असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उल्हासनगर उपशहरप्रमुख सुभाष हटकर यांनी केला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. त्या दोघांना एकत्र येण्यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नसल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्या दोघांनाही एकत्र येण्यासाठी कोणाचीही गरज नसल्याचे ते म्हणाले. दोघांना वाटले तर ते एकमेकांना फोन करु शकतात, असेही ते म्हणाले. पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत असतो, असेही त्यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत