सावदा-थोरगव्हाण रोडवर दुचाकीस्वारावर चाकू हल्ला, दोन जणांचे कृत्य
सावदा-थोरगव्हाण रोडवर दुचाकीस्वारावर चाकू हल्ला, दोन जणांचे कृत्य
लेवाजगत न्यूज सावदा -सावदा येथील तरुण थोरगव्हाण येथून सावद्याकडे दुचाकीने येत होता. या दुचाकीस्वारावर थोरगव्हाण सावदा रोडवर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. याप्रकरणी सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.
सावदा येथील रजानगरातील रहिवासी तरुणर जुलैच्या रात्री ७.४५ ते ८ वाजेदरम्यान दुचाकीने थोरगव्हाण येथून सावदा कडे येत होता. यावेळी दोन अनोळखी अर्शद वाजिद खाटीक याचे मागून काळ्या रंगाच्या दुचाकीने आले. त्यापैकी दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने हातातील चाकूने अर्शद वाजीद खाटीक याचे पाठीवर वार करून दुखापत केली. तक्रारदाराला पैसे मागून त्याचा मोबाइल हातातून हिसकावून पळून गेले. याप्रकरणी सोमवारी दुपारी दोघांवर गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहे. अरशद खाटीक यांचेवर जळगाव येथे उपचार सुरू आहे.
दरम्यान, दुचाकीस्वार तरुणावर हल्ला करणारे कोण होते ? त्यांचा उद्देश काय? याचा शोध घेण्याचे आव्हान आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत