Contact Banner

सुकी नदी पात्रात पोहायला गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह ४ दिवसांनी सापडला अन् पुन्हा गेला वाहून!

  

Sukī-nadī-pātrāta-pōhāyalā- gēlēlyā-bēpattā-taruṇācā-mr̥tadēha--4-divasānnī-sāpaḍalā-ana-punhā- gēlā-vāhūna!

सुकी नदी पात्रात पोहायला गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह ४ दिवसांनी सापडला अन् पुन्हा गेला वाहून!

लेवाजगत न्यूज सावदा-सुकी नदीपात्रात पोहायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह चार दिवसांनी लोहारा परिसरात आढळून आला मात्र, जोरदार पाण्याच्या प्रवाहात किनाऱ्यावर लागलेला मृतदेह पुन्हा वाहून गेला. सोमवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू होता. पण नदीपात्र खडतर असल्याने मृतदेह आढळून आला नाही. तसेच त्या भागात मोबाइल रेंज नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.

     विवाहित तरुण रवींद्र दगडू चौधरी उर्फ महेंद्र कोळी  (वय ३१, रा. रोझोदा) हा मित्रांसोबत गारबर्डी धरण परिसरातील सुकी नदीपात्रात २१ जुलै रोजी संध्याकाळी पोहण्यासाठी गेला होता. पोहताना तो बेपत्ता झाला आणि तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. २४ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास लोहारा परिसरातील अतिदुर्गम भागात नदीच्या कडेला तरुणाचा मृतदेह पावरा समाजातील काही मुलांना आढळून आल्याने लोहारा सरपंच लियाकत जमादार यांनी याबाबत सावदा पोलिसांना माहिती दिली. उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व सहकारी दुपारी १२ वाजता घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांना बोलावले पण ते येण्याआधीच नदीचा प्रवाह वाढल्याने मृतदेह पुन्हा वाहून गेला. दरम्यान, मृताच्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कारासाठी तयारीसुद्धा केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.