उरण राजे वीर वाजेकर जयंतीनिमित्त महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती
उरण राजे वीर वाजेकर जयंतीनिमित्त महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती
उरण (सुनिल ठाकूर )रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय महालण विभाग, फुंडे प्राणिशास्त्र विभागामार्फत उरण राजे वीर वाजेकर जयंतीनिमित्त यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आपत्ती व्यवस्थापन जनजागृती करण्यात आली. नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षक, श्री मनोहर म्हात्रे, असिस्टंट कंट्रोलर नागरि संरक्षण दल, उरण हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी त्यांनी प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता, प्रशिक्षणातील विषय, प्रात्यक्षिके त्यातून मिळणारी माहिती चा वापर आपण आपली व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षितता व आपल्या भविष्यातील करियर साठी पण करू शकतो असे नमूद केले. प्रा. डॉ आमोद ठक्कर विभाग प्रमुख प्राणिशास्त्र यांनी प्रास्ताविक करताना उरणच्या नागरिकांना जवळपास असलेल्या ONGC, BPCL, सर्व बंदर, समुद्र किनारा इत्यादीमुळे असलेले आपत्ती चे धोके लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनाच्या आवश्यकता विशद केली .
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पवार पी. जी. ह्यांनी विद्यार्थ्यांनी हा कोर्स व्यवस्थित पूर्ण करून भविष्यात पुढचे ही कोर्स करावेत असे आवाहन केले. तसेच त्यांनी महाविद्यालयात सुरु असलेले विविध उपक्रम व नवीन अभ्यासक्रम ह्याची माहीती दिली. नागरि संरक्षण दल, उरण चे श्री. शिरसाट उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. जावळे ह्यांनी केले. सूत्रसंचालन डॉ श्रेया पाटील ह्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ आर. बी. पाटील जोशी के. डी. ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्राणिशास्त्र विभागाचे विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत