महिला कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर अश्लीस मेसेज पाठवल्याचा आरोप करत विमा अधिकाऱ्यास मारहाण
महिला कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर अश्लीस मेसेज पाठवल्याचा आरोप करत विमा अधिकाऱ्यास मारहाण
वृत्तसंस्था धुळे-खासगी विमा कंपनीच्या कार्यालयातील सहाय्यक शाखा व्यवस्थापक नितीन सोमनाथ पाटील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला त्रास देताे. मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवताे असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह महिला पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कार्यालयात त्याला मारहाण केली.
शहरातील एका विमा कंपनीच्या कार्यालयात निकुंभे येथील नितीन साेमनाथ पाटील (वय. ३५, ह. मु. हजारे काॅलनी) हा सहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तो त्रास देताे. अंगलट करण्याचा प्रयत्न करताे. तसेच मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवताे अशी तक्रार या ठिकाणी काम करणाऱ्या एका महिला कर्मचारीने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख शुभांगी पाटील, जिल्हा संघटिका हेमा हेमाडे, डाॅ. जयश्री वानखेडे यांनी विमा कंपनीचे कार्यालय गाठत पाटील याला जाब विचारला. पण उडवाउडवीची उत्तर मिळाली. त्यामुळे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पाटील याला मारहाण करत त्याची थेट आझाद नगर पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली. परिसरात गर्दी झाली होती.
शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी विमा कंपनीच्या नाशिक येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाटील यांना निलंबित करण्याची मागणी केली. या विषयीचे पत्र धुळे येथील कार्यालयाला पाठवण्यात येईल, असे आश्वासन विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसेना महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, विनोद जगताप, सुनिल पाटील, छोटू माळी, संजय जगताप, कैलास मराठे, पिनू सूर्यवंशी, अनिल शिरसाठ, नितीन जडे, गुलाब धोबी, विवेक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
अखेर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा
या प्रकरणी विमा कंपनीत कार्यरत ३२ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. त्यानूसार नितीन सोमनाथ पाटील (रा. निकुंभे, ता. धुळे) हा एक वर्षापासून सतत शेरेबाजी, पाठलाग करत होता. त्याने २५ जूनला अश्लील एसएमएस पाठवला. या विषयी जाब विचारल्यावर नितीनने अरेरावी केल्याचे तक्रारीत नमूद अाहे. त्यानूसार आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत