Contact Banner

शेतीच्या वादातून मुलाने केला सावत्र आईचा विळ्याने गळा चिरून खून

 

Śhētīchyā-vādātūna-mulānē-kēlā-sāvatra-ā'īchā-viḷyānē-gaḷā-cirūna-khūna

शेतीच्या वादातून मुलाने केला सावत्र आईचा विळ्याने गळा चिरून खून 

वृत्तसंस्था वैजापूर -३३‎ वर्षांच्या मुलाने धारदार विळ्याने‎ गळा चिरून हत्या केल्याचा‎ धक्कादायक प्रकार शनिवारी‎ सकाळी अगरसायगाव येथे घडला.‎ आशाबाई घमाजी जाधव (रा.‎ अगरसायगाव, ता. वैजापूर) असे‎ हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.‎ 



   रागात आईची विळ्याने हत्या‎ केल्यानंतर मुलाने विहिरीत उडी‎ मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न‎ केला. मात्र, नागरिकांनी त्याला‎ सुखरूपपणे बाहेर काढले. याची‎ महिती पोलिसांना कळवल्यानंतर‎ त्यांनी आरोपी नानासाहेब जाधवला‎ ताब्यात घेतले.‎ अगरसायगाव येथील नानासाहेब‎ जाधव याचे शेतजमिनीवरून सावत्र‎ आई आशाबाई यांच्याशी शनिवारी‎ भांडण होऊन शाब्दिक चकमक‎ उडाली होती.

    रागाच्या भरात‎ नानासाहेब याने सावत्र आईच्या‎ गळा व चेहऱ्यावर विळ्याने वार‎ केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या‎ घटनेमुळे भांबावलेल्या नानासाहेबने‎ शेतातील विहिरीकडे पळत जाऊन‎ उडी घेऊन आत्महत्या करण्याचा‎ प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी‎ त्याला विहिरीतून बाहेर काढले.‎ घटनेची माहिती वैजापूर पोलिसांना‎ दिल्यानंतर वैजापूर ठाण्याचे‎ निरीक्षक संजय लोहकरे,‎ उपनिरीक्षक पाटील, उपनिरीक्षक‎ रज्जाक शेख, ज्ञानेश्वर शिंदे,‎ भगवान सिंगल, पवार, गणेश पठारे,‎ आय बाइक पथकाचे जोनवाल‎ गायकवाड यांनी घटनास्थळी‎ पोहोचून संशयित आरोपीला ताब्यात‎ घेतले.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.