Contact Banner

 

lewajagat

यावल येथून ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर विशेष बससेवा सुरू करा-डॉ. कुंदन फेगडेंची मागणी

लेवाजगत न्यूज यावल -यावल  ते ओंकारेश्वर, उज्जैन (मध्य प्रदेश) व त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) येथे बससेवा सुरू करावी, या मागणीसाठी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी डॉ. कुंदन फेगडे यांनी निवेदन दिले. येत्या सोमवारपासून श्रावण महिना सुरु होत आहे. या निमित्त यावल तालुक्यातील भाविकांना ओंकारेश्वर, उज्जैन व त्र्यंबकेश्वर येथे ये-जा करणे सोयीचे व्हावे यासाठी बससेवा सुरू करावी अशी मागणी त्यांनी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे निवेदनातून केली. याबाबत विचार करून असे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.