खोटे व बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक गुन्हा दाखल आरोपी विनोद चौधरीस अटक
खोटे व बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक गुन्हा दाखल आरोपी विनोद चौधरीस अटक
लेवाजगत न्यूज सावदा-खोटे व बनावट दस्तावेज तयार करून केलेल्या फसवणूकीबाबत सावदा प्लाट एरियातील आरोपी विनोद चौधरीस सावदा पोलिसांनी गुरूवार दि.८ रोजी अटक केली.
खोटे व बनावट दस्तावेज तयार करून केलेल्या फसवणूकीबाबत व त्याला सदर कामी साथ देणाऱ्या व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल होणेसाठी मांगलवाडी ता.रावेर येथील मधुकर चौधरी यांनी दि.२२ जुलै २०२२ रोजी सावदा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने रावेर येथील मे ज्युडी.मॅजि दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मांगलवाडी ता.रावेर येथील विनोद सुधाकर चौधरी (ह.मु.सावदा प्लाट एरिया) याच्या विरूद्ध सावदा पो.स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र आरोपीने अटकपूर्व जामीन दाखल केला होता.भुसावळ कोर्टाने अटकपूर्व जामीनही फेटाळल्याने सावदा पो.स्टे.ने या गुन्हयात पोलिस अधिक्षक यांची मंजूरी आल्यावर आरोपीस अटक करण्याचे ठरवले होते. सदर गुन्हयात आरोपीस अटक करण्याची मंजूरी आल्याने गुरुवारी अटक करण्यात आली आहे.त्याच्या विरूद्ध भादवि कलम १५६ (३ )अन्वये ४०६,४२०,१९३,१९९,२०० याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--
फिर्यादी मधुकर कडू चौधरी (वय ७२) यांचे वडीलांचे नावाने मांगलवाडी ता.रावेर शेत गट नं ८९/१ ही शेतजमीन होती.सदरच्या शेतजमीनीपैकी काही क्षेत्र हतनूर प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आले असून काही क्षेत्र शिल्लक आहे.फिर्यादी चौधरी यांचे मयत वडीलांच्या मालकीचे नमूद मिळकतीपैकी संपादनाव्यतिरिक्त शिल्लक असलेली शेतजमीन आरोपीने मयताचे वारसाची संमती न घेता सावदा येथील वकील यांचेकडून संमतीपत्रावर दि.२३ नोहेंबर२०२१ रोजीच्या संमतीपत्रावर फिर्यादी यांची खोटी व बनावट सही करून तसेच त्यांचे मोठे भाऊ गोविंदा चौधरी यांचा सुध्दा खोटा व बनावट स्वरूपाचा अंगठा करून दस्तावर वारसही कमी दाखवून आरोपी याने हा दस्त खरा असल्याचे भासवून त्याचा दुरूपयोग करून स्वतःचा गैरप्रकारे आर्थिक फायदा करून घेण्याच्या उद्देशाने कोणतीही सुचना न देता कार्यकारी अभियंता जळगांव पाटबंधारे विभागाकडे सादर करून सदरची मिळकत ही ११ महिने भाडेकराराने कसण्यास घेतली.सदर प्रकरणाची संबंधित विभागाकडून फिर्यादी यांनी माहीती अधिकाराने माहीती घेतली असता सदर बाब उघडकीस आली. याबाबत सावदा पोलिस स्टेशनचे ए पी आय जलिंदर पळे यांच्या मार्गदर्शना खाली पो.उपनिरिक्षक अन्वर तडवी पुढील तपास करीत आहेत.रावेर न्यायालयात त्यांना जामीन मंजूर झाला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत