Header Ads

Header ADS

पाचोरा येथील पत्रकार हल्ला प्रकरणी कठोर कारवाई करा ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनची निवेदनाद्वारे मागणी

 

Tapti-Satpuda-Journalist-Foundation-Demand-Through-Report-Strict-Action-In-Pachora-Journalist-Attack-Case

पाचोरा येथील पत्रकार हल्ला प्रकरणी कठोर कारवाई करा ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनची निवेदनाद्वारे मागणी

लेवाजगत न्यूज सावदा-पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोर्‍या चे आमदार किशोर पाटील यांनी अर्वाच्या भाषेत अश्विन शिवीगाळ करून तुला बघून घेईल अशी धमकी फोनवरती काही दिवसापूर्वी दिल्यानंतर येथील पत्रकार संदीप महाजन यांना दि.१० रोजी दुपारी काही गुंड लोकांनी तोंडावरती रुमाल टाकून गाडी थांबवून हल्ला करून बेदम मारहाण केली पत्रकार संदीप महाजन यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला देऊन संबंधित गावगुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ  पत्रकार संघाने आज सावदा येथे सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी पत्रकारांकडून करण्यात आली निवेदन देते वेळी ताप्ती सातपुडाजर्नलिस्ट फाऊंडेशन चे अध्यक्ष श्यामकांत पाटील, आत्माराम तायडे राजेंद्र भारंबे प्रवीण पाटील पंकज पाटील,कमलाकर पाटील, रवींद्र हिवरकर,साजिद शेख, मिलिंद टोके,जितेंद्र कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी, राज चौधरी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.