सर्व सामान्य ग्राहकांना ५ हजार व शेत कऱ्यांना १० हजार पेक्षा जास्त रकमेचे वीज बिल रोखीत भरता येणार नाही.
सर्व सामान्य ग्राहकांना ५ हजार व शेत कऱ्यांना १० हजार पेक्षा जास्त रकमेचे वीज बिल रोखीत भरता येणार नाही.
लेवाजगत न्युज मुंबई:- "१ ऑगस्ट २०२३ पासून ५ हजार व १० पेक्षा अधिकचे वीज बील भरावे लागणार ऑनलाइन वीज" ऑनलाइन वीज बिल भरण्याचे महावितरणकडून आवाहन
मुंबई दि. २८ जुलै २०२३ विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणचे वीज बिल रोख रक्कमेत भरण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ही पध्दत सुरक्षित व सुविधाजनक असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३१ मार्च २०२३ रोजीच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या रोख रक्कमेने वीज बील भरण्याच्या रकमेवर मर्यादा घालण्यात आली आहे. महावतिरणचे सर्व ग्राहक (लघुदाब शेती वर्गवारी सोडून) सर्वांना प्रत्येक महिन्याला फक्त ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबीलच रोख रक्कमेत भरता येणार आहे. तर लघुदाब शेती वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोख रक्कम फक्त १० हजार रुपयांपर्यंतच भरता येणार आहे.
महावितरणच्या ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करता येईल. या बाबतची सर्व माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करता येईल. तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत ही वीज बिल भरता येईल. या व्यतिरिक्त रु.५,०००/- पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ग्राहक निहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीजबिलावर दिलेला आहे.
ऑनलाईन पध्दतीने वीजबिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त रु. ५००/-) इतकी सवलत देखील देण्यात येते. सध्या महावितरणचे ११० लाख (६५ टक्के) ग्राहक ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत असून यातून महावितरणला जवळपास २२५० कोटी रुपयांची मिळतात.
ऑनलाईन पध्दतीने भरणा केल्यास नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS द्वारे त्वरित पोच मिळते तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर Paymnt History तपासल्यास वीजबिलानुसार भरणा केलेल्या रक्कमेची माहिती, तपशील व पावती उपलब्ध्द होते. ऑनलाइन वीज बिल भरणा पध्दत अत्यंत सुरक्षित असून यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधल्यास शेकेचे निर्सन कले जाते.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत