Contact Banner

समृद्धी महामार्गावर १०० फुटावरून गर्डर कोसळल्याने १४ ठार

 

14-killed-in-Samriddhi-Highway-100-feet- collapse-of-girder

समृद्धी महामार्गावर १०० फुटावरून गर्डर कोसळल्याने १४ ठार

वृत्तसंस्था ठाणे-ठाण्यात मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. ठाण्यातील शहापूरजवळ गर्डर लॉन्चिंग मशीन पडले. या खाली दबून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. शहापूर पोलिसांनी सांगितले की, समृद्धी एक्स्प्रेस हायवेच्या तिसऱ्या टप्प्याचे बांधकाम सुरू असून, त्यात मशीनचा वापर केला जात होता. घटनास्थळी मंत्री दादा भुसे पोहोचले असून त्यांनी स्थळाची पाहणी केली.

   शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी एक्सप्रेस हायवेच्या तिसऱ्या टप्प्याचे बांधकाम सुरू होते. ज्यामध्ये मशीनचा वापर केला जात होता.

   पोलीस आणि अग्निशमन दल एकत्रितपणे बचावकार्यात गुंतले आहेत.

   वृत्तानुसार, शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे १४ मृतदेह आणण्यात आले आहेत. तीन ते चार जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधारामुळे अजून किती लोक मशीनच्या गर्डरखाली गाडले गेले हे सांगता आले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.