अम्लपित्त अथवा पित्त होणे-डॉ. सुशांत शशिकांत पाटील,आयुर्वेदाचार्य
अम्लपित्त अथवा पित्त होणे-डॉ. सुशांत शशिकांत पाटील,आयुर्वेदाचार्य
पित्त या शब्दाची व्युत्पत्ती/व्याख्या मूळ शब्द ‘तप’ पासून झालेली आहे. तप म्हणजे उष्णता. पित्तात दोन्ही तत्वांचा समावेश आहे, ‘अग्नी’ आणि ‘जल’ तत्व. पित्ताचा प्रवाही गुण गतिशीलता दर्शवितो. अष्टांग हृदय नावाच्या ग्रंथात पित्ताच्या सात गुणांचे वर्णन केले आहे:
‘पित्तम सस्नेह तिक्षोस्नम् लघुविश्राम सरं द्रवम्’,
असे सूत्र आहे. म्हणजेच पित्त हे किंचित तैलीय, भेदक, उष्ण, हलके, सुगंधी, प्रवाही आणि जलरूपी असते. पित्तामुळे चयापचय क्रियेला किंवा परिवर्तनाला चालना मिळते. पित्त पचन, शरीराचे तापमान स्थिर राखणे, दृष्टीय आकलन, त्वचेचा रंग आणि वर्ण, बुद्धी आणि भावना नियंत्रित करते.
पित्त दोषात असमतोल झाल्यास शारीरिक अनारोग्य, आजार आणि भावनिक समस्या उद्भवू लागतात. यालाच पित्त होण्याची कारणे अथवा लक्षणे म्हणता येईल.
पित्त होण्याची कारणे / असमतोलाची लक्षणे
पित्त दोषाची शारारिक लक्षणे
भूक आणि / किंवा तहान वाढणे.
संसर्ग
केस पांढरे होणे / गळणे.
भोवळ येणे आणि / किंवा अर्धशिशी
अचानक भयंकर उष्णता जाणवणे आणि शरीराला गारवा देणाऱ्या पदार्थाची निकड भासणे.
श्वासात आणि शरीराची दुर्गंधी
घसा कोरडा पडणे.
जेवणाची वेळ टाळल्यास मळमळ वाटणे.
झोप न लागणे
वेदनादायी मासिक पाळीचा त्रास.
स्तनात / वृषणात नाजुकपणा जाणवणे.
पित्तामुळे अनेक आजार /व्याधी /लक्षणे उद्भवू शकतात, त्यातील काही खालील प्रमाणे आहेत
छातीत जळजळ
उन्हाने त्वचेचा क्षोभ, इसब, मुरूम, त्वचेचे रोग.
आम्लदाह, पोटातील व्रण.
ताप.
रक्तात गुठळ्या आणि पक्षाघात.
मुत्रपिंडाचा संसर्ग.
थायरॉइड ग्रंथीचे विकार.
कावीळ.
सांधेदुखी .
अतिसार .
थकव्याची लक्षणे दिसणे
आंधळेपणा अथवा रातांधळेपणा.
रोगप्रतिकार प्रणालीचा आजार.
उदासीनता.
अम्लपित्ताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो. शतावरी, ज्येष्ठमध,कपिकच्छु, दुर्वा या वनस्पती द्रव्यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने केल्यास अम्लपित्तामध्ये लाभ होतो. अम्लपित्ताचा नेहमी त्रास असणा-यांनी आवळ्याचा मुरब्बा खावा. (आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला हा मोरावळा तयार करून ठेवावा.) आवळा हा थंड गुणधर्माचा, पित्तशामक असल्याने त्याचा अम्लपित्तामध्ये उत्तम उपयोग होतो. आयुर्वेदातील पंचकर्मापैकी वमन आणि विरेचन या दोन कर्माचा, अम्लपित्तामध्ये चांगला उपयोग होतो.
डॉ. सुशांत शशिकांत पाटील,आयुर्वेदाचार्य :
BAMS DYA सर्वद आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय
विद्या नगर भुसावळ रोड,फैजपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत