Header Ads

Header ADS

स्वतः रक्तदान करून साजरा केला महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी आपला अवतरण दिन

 

Mahamandaleshwar-Janardana-Hariji-Maharaja-celebrated-his-avatar-day-by-donating-his-own-blood

स्वतः रक्तदान करून साजरा केला महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी आपला अवतरण दिन

लेवाजगत न्यूज फैजपूर :- सतपंथ चारिटेबल ट्रस्ट फैजपुर आयोजित रक्तदान शिबिरात येथील सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी स्वतः रक्तदान करून अवतरण दिन साजरा केला. सुरत येथील राजूभाऊ राणे यांचे तर्फे ४५ गुलाब पुष्प हार अर्पण करून मोतीचूर लाडू तुला करण्यात आली.

Mahamandaleshwar-Janardana-Hariji-Maharaja-celebrated-his-avatar-day-by-donating-his-own-blood


 प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा करताना राष्ट्रीय कार्य तसेच समाजभिमुख उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत असा संदेश त्यांनी यावेळी दिला. या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्त संकलनाचे कार्य संजीवनी ब्लड सेंटर फैजपूर यांचे संचालक नितीन इंगळे व रक्तपेढी समन्वयक नेमचंद बऱ्हाटे यांच्या संपूर्ण टीमसह सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत रक्त संकलनाचे कार्य केले. दिवसभर परमपूज्य महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी सतपंथ मंदिरात श्रद्धाळू भक्तगण, 

Mahamandaleshwar-Janardana-Hariji-Maharaja-celebrated-his-avatar-day-by-donating-his-own-blood


 सामाजिक, राजकीय, तथा अधिकारी वर्ग, डॉक्टर, उद्योजक, शिक्षक, दिव्यांग बांधव  यांनी महाराजांचे अभिष्टचिंतन केले. यात संत सुरेश शास्त्री मानेकर बाबा, संत श्याम चैतन्यजी महाराज, ह भ प धनराज महाराज, हभप भानुदास महाराज, महंत नितीन महाराज,सत्यप्रकाश स्वामी,प्रांत कैलास कडलक, आ. संजय सावकारे, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल दादा जावळे, डॉ. कुंदन फेगडे, डॉ. केतकी ताई पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, श्रीराम पाटील, पद्माकर महाजन रावेर, अनिल चौधरी भुसावळ, एपीआय जालिंदर पळे, धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पी.आर. चौधरी, प्रभारी प्राचार्य अनिल भंगाळे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, मिलिंद दादा वाघुळदे, विष्णू भाऊ भंगाळे,  प्रभाकर अप्पा सोनवणे, नरेंद्र नारखेडे, सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, मुखी गण, पत्रकार शाम पाटील,मिलींद टोके,पिंटू कुलकर्णी,पंकज पाटील,कमलाकर पाटील,उमाकांत पाटील आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.