Header Ads

Header ADS

बोदवड रेल्वे क्रॉसिंग नाडगाव - नांदगाव उड्डाणपूल सुरु ! आमदारांनी सुरु केलेला मार्ग परत डिआरएम च्या आदेशाने पोलिसांनी बंद केला , परत आमदार चंद्रकांत पाटलांनी मार्ग केला मोकळा !

 

बोदवड रेल्वे क्रॉसिंग नाडगाव - नांदगाव उड्डाणपूल सुरु !
आमदारांनी सुरु केलेला मार्ग परत डिआरएम च्या आदेशाने पोलिसांनी बंद केला , परत आमदार चंद्रकांत पाटलांनी मार्ग केला मोकळा !
आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचा दणका 

लेवाजगत न्युज बोदवड:- 

              तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंग नाडगाव - नांदगाव उड्डाणपूल पूर्णत्वास येऊनही तो बंद अवस्थेत होता. बराच वेळ गेट बंद असल्या कारणाने प्रवासी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यावेळेस , आमदार चंद्रकांत पाटिल यांनी जिल्हाधिकाऱ्यांसहित , भुसावळ विभागीय रेल्वे विभागाला पत्रव्यवहार करत दोन दिवसांत उड्डाणपूल सुरु न केल्यास , स्वतः आंदोलन करुन मार्ग मोकळा करण्याबाबत पत्र दिलेले होते. या पार्श्वभूमीवर; बोदवड रेल्वे स्थानकावर आमदार चंद्रकांत पाटिल रेल रोको आंदोलनासाठी दाखल झाले होते. याच वेळी त्यांनी उड्डाणपूलाची पाहणी केली. जेसीबिच्या साहाय्याने लोखंडी बॅरिकेट्स बाजूला करायला लावले. त्यानंतर वाहतुक सुरळीत झाली. त्यानंतर ; आमदार चंद्रकांत पाटिल मुक्ताईनगर रवाना झाले. 


▪️ आमदारांनी सुरु केलेला मार्ग परत डिआरएम च्या आदेशाने पोलिसांनी बंद केला , परत आमदार चंद्रकांत पाटलांनी मार्ग केला मोकळा !

बोदवड रेल्वे क्रॉसिंग नाडगाव नांदगाव उड्डाणपूलावरील वाहतुक सुरळीत झाल्यानंतर डिआरम भुसावळ यांनी रेल्वे पोलिसांना परत उड्डाणपूल बंद करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर , उड्डाणपुल आरपीएफ इन्स्पेक्टर चौधरी यांनी ठेकेदाराला बॅरिकेट्स लावण्याचे सांगून उड्डाणपूलाचा मार्ग बंद केला. उड्डाणपूलाच्या बोदवडकडील दिशेने उतरत्या जागेवर रस्त्यामधोमध इलेक्ट्रीक पोल उभा असल्याने अपघाताची शक्यता असल्याची माहिती डीआरएम भुसावळ यांना  खासदार रक्षा खडसे यांनी दिल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे ; आमदार चंद्रकांत पाटिल यांनी सुरु केलेला उड्डाणपुलाचा मार्ग खासदारांनी हस्तक्षेप करत बंद पाडल्याच्या दबक्या आवाजात चर्चा ऐकावयास मिळाल्या. परंतु , रसत्या मधोमध कुठेही इलेक्ट्रीक पोल उभा नव्हता , चुकीची माहिती दिल्याने सदरील प्रकार घडला.

उड्डाणपूलाचा मार्ग मोकळा करुन आमदार चंद्रकांत पाटिल मुक्ताईनगर रवाना झाल्यावर परत रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल बंद केल्याची माहीती मिळताच आमदार चंद्रकांत पाटिल डंके की चोट पे परत उड्डाणपूलावर हजर झाले. आमदार चंद्रकांत पाटिल यांनी जिल्हाधिकार्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यानंतर ,  डिआरएम भुसावळ यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यानंतर , कंत्राटदार यांना आमदार पाटिल यांनी विचारणा केली , तुमच्या एजन्सीचे काम पुर्ण झाल्यावर तुम्ही हा मार्ग बंद कसा काय करु शकता .? बॅरिकेट्स लावणे तुमचे काम नाहि. त्यानंतर , रेल्वे पोलिसांशी चर्चा झाल्यावर आमदार चंद्रकांत पाटिल यांनी परत जेसीबीच्या साहाय्याने बॅरिकेट्स हटवले. उड्डाणपुलावरील वाहतुक सुरु झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.


उड्डाणपुलाचा मार्ग परत परत बंद केल्याने ऊपस्थित नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे नाडगाव नांदगावच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत उड्डाणपूलाचे श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.