Header Ads

Header ADS

बोदवड रेल्वे स्टेशनवर "रेल रोको आंदोलन" आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल येताच रेल्वे प्रशासनाची उडाली तारांबळ ! पोलिस प्रशासनाचा बंदोबस्त मोडत , आंदोलन कर्त्यांसहित आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल रेल्वे स्थानकावर !


 बोदवड रेल्वे स्टेशनवर "रेल रोको आंदोलन"
आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल येताच रेल्वे प्रशासनाची उडाली तारांबळ ! 
पोलिस प्रशासनाचा बंदोबस्त मोडत , आंदोलन कर्त्यांसहित आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल रेल्वे स्थानकावर !

लेवाजगत न्युज बोदवड:- 

             रेल्वे स्थानकावर कोरोना काळानंतर बंद झालेल्या व नविन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी रेल रोको आंदोलन पार पडले. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात होता. रिक्षा स्टाॅप जवळच प्रवेश मार्ग बंद करण्यात आले होते. रेल्वे स्थानकावर जाणार्या सर्व मार्गावर पोलीस तैनात होते. प्लॅटफॉर्म तिकिट काढल्यावरही आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी बाहेर रिक्षा स्टाॅप जवळच रोखून धरले होते. यावेळी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल आंदोलना स्थळी दाखल होताच रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. पोलीस प्रशासनाचा आंदोलनकर्त्यांवरील दबाव पाहता आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी भुसावळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत , बंदोबस्त मोडून काढत आंदोलनकर्त्यांना सोबत घेत रेल्वे स्थानकावर दाखल झाले. यावेळी डिसीएम श्री. पाठक यांनी पंधरा दिवसांचा वेळ आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्यासहित आंदोलन कर्त्यांनी हि मागणी धुडकावून लावत रेल्वे गेटच्या दिशेने मार्गस्थ झाले. रेल्वे गेट मधिल लोहमार्गावर रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या दिव्यांग बांधवांसोबत आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल , प्रवासी संघटना , व्यापारी संघटना , रिक्षा युनियन , विद्यार्थी वर्ग , ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. पंधरा दिवसांत ठोस तोडगा न निघाल्यास उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी यावेळेस कळविले.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटिल , राष्ट्रीय विकलांग पार्टिचे प्रदेशाध्यक्ष धनराज गायकवाड, नगराध्यक्ष आनंदा पाटिल , गोपाल व्यास ,  विकास कोटेचा , विरेंद्र सिंग पाटिल , गोपाळ अग्रवाल ,  डाॅ. राजेश मुथा , नगरसेवक ननवाणी , बिहारी आहुजा , मिलिंद बडगुजर , अमोल तेली , सुरेश वर्मा राष्ट्रीय विकलांग पार्टीचे पदाधिकारी प्रवीण वंजारी , भगवान सूर्यवंशी , किशोर बडगुजर , माणिकचंद जैन , श्यामलाल लोंढे , रवी झाल्टे , अंबिका शहापुरे  , शोभा शेळके यांच्यासमवेत मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.