गांजाची केस न करण्यासाठी पंधरा हजाराची घेताना सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात
गांजाची केस न करण्यासाठी पंधरा हजाराची घेताना सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात
लेवाजगत न्यूज चोपडा - गांजाची केस न करण्यासाठी व दुचाकी सोडवण्यासाठी ३० हजार रुपये घेऊनही अडवणूक करत पुन्हा १५ हजारांची लाच मागितली. ही रक्कम घेताना चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक फौजदारास एसीबीच्या पथकाने अटक केली.
शिरपूर तालुक्यातील एकाच्या तक्रारीवरून २५ ऑगस्ट रोजी दुपारी चोपडा शहरात ही कारवाई करण्यात आली. शिवाजी ढगू बाविस्कर (५२) असे फाैजदाराचे नाव आहे.
तक्रारदाराचे चुलत भाऊ व त्याच्या मित्राची दुचाकी २३ रोजी रात्री पोलिसांनी लासूर गावाजवळ अडवली होती. ‘तुमच्याजवळ गांजा असल्याची माहिती आहे. ठाण्यात चला,’ असे धमकावले. नंतर केस हाेऊ द्यायची नसेल व दुचाकी सोडवायची असेल तर ७५ हजार द्यावे लागतील,’ असे सांगितले. तडजोड करुन ३० हजार रुपये घेतले. तरीही दुचाकी मात्र सोडली नाही. ती सोडायची असेल व गुन्हा दाखल करायचा नसेल आणखी २० हजार रुपये मागितले. त्यापैकी १५ हजार रुपये घेताना बाविस्कर अडकला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत