Header Ads

Header ADS

शिरसाळा मारूती दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा भवानी घाटात कार व दुचाकीचा भीषण अपघात मृत्यू तर ५ जण जखमी

Shirsala-Maruti-for-darshan-of-the-young-person-car-and-bicycle-in-the-ghat-accident-fatal-and-5-injured


शिरसाळा मारूती दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा भवानी घाटात कार व दुचाकीचा भीषण अपघात मृत्यू तर ५ जण जखमी

लेवाजगत न्यूज जामनेर- शहराजवळील भवानी घाटात चारचाकी व दुचाकी वाहनाचा भीषण अपघातात शिरसाळा मारूती दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

शिरसाळा मारूती दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा भवानी घाटात कार व दुचाकीचा भीषण


अधिक माहिती अशी की, शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी बोदवडकडून ४ चाकी वाहन जामनेर कडे येत होते तर पाचोरा तालुक्यातील पुंनगाव येथील तिघेजण शिरसाळा मारुती मंदिरात दर्शनासाठी जात असताना रामवन मंदिरा समोर रस्त्यावर दोघे वाहनाचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात  अर्जुन सुकलाल जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. तर अर्जुन जाधव सुरवाडे व तुषार संतोष जामदार रा. पुंगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन नाल्यात जावून पडल्याने कारमधील गीतांजली सुहास बांगर, वंदना माधव दांभोरे, प्राजक्ता विठ्ठल आसुदे रा. छत्रपती संभाजीनगर हे जखमी झाले. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.