कूर्हे पानाचे येथील हॉटेल राजवाडामधील सेक्स रॅकेटचा भांडाफोड,तीन तरुणींची सुटका
कूर्हे पानाचे येथील हॉटेल राजवाडामधील सेक्स रॅकेटचा भांडाफोड,तीन तरुणींची सुटका
लेवाजगत न्यूज भुसावळ- कूर्हे पानाचे येथील हॉटेल राजवाडा मध्ये रविवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकून केला सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. हॉटेलचे मालक व व्यवस्थापकाकडून परप्रांतीय 3 युवतींची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले . या प्रकरणी हॉटेल मालक संभाजी एकनाथ पाटील राहणार जामनेर आणि व्यवस्थापक पंडित टोंगळे राहणार कुऱ्हे पानाचे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कूर्हे पानाचे येथील राजवाडा हॉटेल व लॉजिंग वर पोलिसांनी रविवारी दुपारी अडीच वाजता छापा टाकला त्यात हॉटेल मॅनेजर पंडित टोंगळे व मालक संभाजी एकनाथ पाटील स्वतःच्या फायद्यासाठी पीडित महिलांना पैशाचे प्रलोभन देऊन देह व्यापारास वृत्त करत होते. पोलिसांनी तिन्ही महिलांना विचारपूस केल्यावर ही माहिती समोर आली त्यामुळे स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधात अधिनियम १९५६ नुसार हॉटेल व्यवस्थापक पंडित वय ५६ राहणार कूर्हे पानाचे भुसावळ व मालक संभाजी एकनाथ पाटील वय ४५ राहणार जामनेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर देहविक्री करणाऱ्या तिन्ही परप्रांतीय तरुणींची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात हलवण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉक्टर एम राजकुमार, अप्पर अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, तालुक्याचे डीवायएसपी सतीश कुलकर्णी, वाहतूक शाखेच्या एपीआय रूपाली चव्हाण, हवालदार प्रदीप पाटील,अनिल झुंजराव यांनी कारवाई केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत