Header Ads

Header ADS

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला धर्मवीर 2 चित्रपट येणार

 

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला धर्मवीर 2 चित्रपट येणार 

लेवाजगत न्युज मुंबई:-Dharmaveer 2 : मराठी चित्रपटांना सध्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. अशातच आता एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. धर्मवीर-2 (Dharmaveer 2) या चित्रपटाची घोषणा प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि  मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी केली आहे. धर्मवीर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

आता धर्मवीर-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धर्मवीर या चित्रपटामध्ये आनंद दिघे यांच्या जीवनात घडलेल्या घटना दाखवण्यात आल्या. आता धर्मवीर-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


मंगेश देसाई यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब यामाध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि 'असा माणूस होणे नाही' हेही सर्वांना समजलं. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, म्हणूनच 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे - भाग 2 ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करतोय, लवकरच...बघुया धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2...साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, लवकरच.."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.