अटल भूजल योजनेतील तिवसाघाटच्या रिचार्ज शाफ्ट पहिल्याच पुरात वाहिल्या ! नागरिकांची कारवाहिचि मागणी !
अटल भूजल योजनेतील तिवसाघाटच्या रिचार्ज शाफ्ट पहिल्याच पुरात वाहिल्या ! नागरिकांची कारवाहिचि मागणी !
लेवाजगत न्युज वरुड :- वरूड तालुक्यातील ३४ गावातील अटल भूजल योजना अंतर्गत नदी नाल्यामध्ये मार्च-एप्रिल-मे महिन्यात तिवसाघाट येथे केलेल्या रिचार्ज शाफ्ट पहिल्याच पुरात वाहून गेल्याने भूजल योजनेचा बट्ट्याबोळ झाला.
भ्रष्टाचार करणाऱ्याना अभय कुणाचे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
वरिष्ठांनी चौकशी करून कारवाहि करावी अशी मागणी सर्वत्र केल्या जात आहे. अटल भूजल योजना प्रोत्साहन निधी अंतर्गत जलसुरक्षा आराखड्यातील प्रस्तावित भूजल पुनर्भरनाच्या उपाययोजने अंतर्गत भूजल पातळी वाढविण्यासाठी केंद्र शासन आणि जागतिक बँक अर्थसहायित अटल भूजल योजनेंतर्गत अटल भूजल योजना राबविण्यात आली.
पुनर्भरण, गाळ काढणे, रिचार्ज शाप्ट तसेच बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती करणे, पर्जन्यमापक यंत्र बसविणे, पाण्याची पातळी मोजण्यासाठी पिजोमिटर बसविणे, नाला खोलीकरण करणे, बंधारे दुरुस्ती करणे यासह विवीध प्रकारची जल संधारणाची कामे अभिसरणातून व लोकांच्या मदतीने केली जातात. याकरिता जिल्हास्तरीय नियोजन आणि समन्वय समितीने १५ डिसेम्बर २०२२ ला मोर्शी १२ , वरुड ३० आणि चांदूरबाजार एक अश्या ४३ ग्रामपंचायतीच्या ३४० रिचार्ज शाफ्ट आणि स्ट्रेंचला १ कोटी ९७ लक्ष २३४ रुपयाचे कामाला प्रशासकीय मंजुरात देऊन जल पुरभरणाच्या उपाय योजना राबवियाचे आदेश देण्यात आले होते. तर २८ डिसेंबर २०२२ ला सुधारित प्रशासकीय मंजुरात देऊन मोर्शी ३ आणि वरुड ४ अश्या ७ ग्रामपंचायत ८५ लक्ष ९३ हजार ५४ रुपयाच्या कामाला मान्यता दिली. अशी अनेक कामे अतिशोषित असलेल्या मोर्शि १५ , वरूड ३४ आणि चांदुरबाजार १ ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला. वरुड तालुक्यात २१७ रिचार्ज शाफ्ट आणि स्ट्रेंच करण्यात आले. यामध्ये नदी ,नाल्यांमध्ये १०० फिट खोल बोअर करून त्यामध्ये सच्छिद्र केसिन्ग टाकण्यात येऊन भूजल पातळी वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अंतर्गत अटल भूजल योजने अंतर्गत कामे केली जात आहेत. वरूड तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटदाराकडून कामे करण्यात आली.
तिवसाघाटची रिचार्ज शाफ्ट पहिल्याच पुरात वाहून गेली तर तालुक्यातील निकृष्ट दर्जाची असल्याने या शेतकरी हिताच्या अटल भूजल योजनेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र असून गावा गावात असंतोष निर्माण झाला आहे.
संपूर्ण कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. माझ्या कडे अद्याप कोणतीही तक्रार आली नसून मी नुकताच कार्यभार स्वीकारला. तरी तिवसाघाटच्या कामाची चौकशी करून कारवाहि करू असे भूजल सर्व्हेक्षण विभागाचे वरिष्ठ भूशास्त्रज्ञ राजेश सावळे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत